रव्याची सांजोरी (ravyachi sanjori recipe in marathi)

#md मदर्स डे चॅलेंज. आईच्या हातचं - 2 मी रवा,गुळाची सांजोरी केली आहे. माझ्या आईकडून मी शिकले आहे. माझी आई सांजोरी छान करते. माझ्या धाकट्या मुलीला त्या फार आवडतात.
कोल्हापूर कडे राळयांची सांजोरी करतात. तांदळाचे पीठ घालून पण करतात.
रव्याची सांजोरी (ravyachi sanjori recipe in marathi)
#md मदर्स डे चॅलेंज. आईच्या हातचं - 2 मी रवा,गुळाची सांजोरी केली आहे. माझ्या आईकडून मी शिकले आहे. माझी आई सांजोरी छान करते. माझ्या धाकट्या मुलीला त्या फार आवडतात.
कोल्हापूर कडे राळयांची सांजोरी करतात. तांदळाचे पीठ घालून पण करतात.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम किसलेले खोबरे थोडे गरम करून घेणे.जास्त भाजायचे नाही. त्याच कढईत साजूक तूप घालून रवा गुलाबीसर भाजून घेणे व थंड होण्यासाठी ठेवावा.
- 2
एका पातेल्यात 1/4 कप पाणी व गूळ घालून गॅस वर ठेवावे. *पाणी कमी झाले तरी चालेल, जास्त नको.गूळ नुसता विरघळून घ्यायचा आहे.पाक करायचा नाही. गॅस बंद करावा.पाणी गार होऊ द्यावे.
- 3
गुळाचे पाणी थंड झाल्यावर त्यात सुंठ पावडर, वेलची पावडर, खोबरे घालून मिक्स करून घेणे.नंतर भाजलेला रवा घालून व्यवस्थित मिक्स करून घेणे.झाकण ठेऊन 8-10 तास छान मुरू द्यावे.**गरम पाण्यात रवा घालू नये.तो शिजू शकतो. म्हणून सर्व थंड झाल्यावर मिक्स करावे.रात्रभर ठेवले तरी चालेल.
- 4
एका वाटी मध्ये मैदा, रवा मिक्स करून घेणे. तुपाचे मोहन घालून पिठाला चांगले चोळून घ्यावे.पिठाची मूठ तयार झाली पाहिजे. थोडे, थोडे पाणी घालून मध्यम घट्ट भिजवून घेणे.झाकून 1/2 तास भिजत ठेवावे.
- 5
रव्याचे सारण घट्ट झालेले असेल ते, चमच्याने सैल करून व मोकळे करून घेणे. रात्रभर गुळाच्या पाण्यात रवा छान मुरतो.कणीक पुन्हा मळून घेणे व त्याचे छोटे गोळे घेणे.
- 6
दोन पुऱ्या लाटून घेणे.एक सारख्या आकाराच्या. एका पुरीवर मध्यभागी सारण भरून घेणे. कडेने बोटाने पाणी लावून घेणे.दुसरी पुरी त्यावर ठेवून कडेने व सारणाच्या बाजूने दाबून घेणे.
- 7
कापणीने कडेचे पीठ कापून घेणे. सांजोरी तयार. याप्रमाणे सर्व सांजोरी करून घ्याव्यात.
- 8
गॅसवर कढई तापत ठेवून त्यात तेल घालणे. तेल तापले की, गॅस मध्यम आचेवर ठेवून सांजोरी दोन्ही बाजूंनी छान तळून घ्याव्यात.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बिना पाकाचे रवा लाडू (Bina Pakache Rava Ladoo Recipe In Marathi)
#md मदर्स डे चॅलेंजआईच्या हातचं. रेसिपी :1आईच्या हातच्या खूप रेसिपी रेसिपी आवडतात.तिलाही वेगवेगळे पदार्थ करायला आवडतात. भाताची खीर, डिंकाचे लाडू, सजोरी, शिरा,बदामाचा शिरा,हे पदार्थ मला आवडतात.त्यातील भाताची खीर, शिरा डिंकाचे लाडू ह्या रेसिपी पोस्ट केल्या आहेत. हे बिना पाकाचे लाडू आहेत. तोंडात टाकताच विरघळणारे.मला व माझ्या मोठ्या मुलीला हे लाडू फार आवडतात. Sujata Gengaje -
पुडाची करंजी (pudachi karanji recipe in marathi)
#dfrमी लता धानापुने यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. Sujata Gengaje -
तीळगूळ पोळी (til gud poli recipe in marathi)
#मकर...मकर संक्रांतीला आवर्जून केला जाणारा प्रकार तीळगूळ पोळी ...पण आमच्या कडे गाजराचा हलवा पण मकर संक्रांतीला करतात ...आज मी दोन्ही प्रकार बनवलेत दोन्ही खूपच सूंदर झालेत ....आमच्या कडे पोळ्या जरा क्रंची आणी खरपूस भाजलेल्या तूप लावून कडकसर अशा आवडतात ...या करून 2-3 दिवस खाऊ शकतो .... Varsha Deshpande -
सुरळीच्या वड्या (surlichya vadya recipe in marathi)
#mdमाझी आई एक सुगरणच. आईच्या हातच्या तश्या सगळ्याच पाककृती खूप आवडतात. ही रेसिपी तशी स्पेशल आहे. तिने ही रेसिपी आजपर्यंत शंभर जणांना तरी शिकवलेली आहे. आज तिचीच पद्धत वापरून रेसिपी पोस्ट करत आहे. आजची मदर्स डे स्पेशल रेसिपी मी माझ्या आईला dedicate करते. नक्की करून पहा. Shital Muranjan -
रव्याची इडली (ravyachi idli recipe in marathi)
Cookpad मराठीची शाळा सुरु आहे आणि पाहिल्या सत्राच्या यशस्वी सांगते नंतर दुसऱ्या सत्राला जोरदार सुरवात झाली. त्यात मी झटपट होणारी रवा इडली ही रेसिपि share करते आहे. नाष्ट्या साठी पटकन होणारी ही रेसिपि हा एक उत्तम पर्याय आहे.#ccs Kshama's Kitchen -
भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#md #माझ्या आई ला भरली वांगी खुप आवडायची म्हणून मदर्स डे अनुषंगाने आज मस्त भरली वांगी बनविण्याचा बेत रचला. Dilip Bele -
ढोकळा (dhokla recipe in marathi)
हा ढोकळा मी माझ्या आई कडून शिकले आहे. हा नाश्त्यासाठी चांगला पदार्थ आहे.Rutuja Tushar Ghodke
-
खान्देश होळी स्पेशल लाडवे (Ladwe recipe in marathi)
#hr "लाडवे " हा होळी स्पेशल खान्देशी पारंपरिक पदार्थ आहे. माझी आई नेहमी होळीला हा पदार्थ बनवते, मी आईकडून शिकले. आजच्या धकधकीच्या जीवनात आपण हे पारंपरिक पदार्थ विसरत चाललोय . आपली परंपरा जपण्याचा माझा हा प्रयत्न 🙏🙏 Vaishali Dipak Patil -
गोड आंबट वरण (मुगडाळ) (god ambat varan recipe in marathi)
#mdमदर्स डे स्पेशल आईच्या हातच्या चवीला उजाळा देता आला मला आईच्या हाथची चव माझ्या हाताच्या वरणात नाही गवसली पण स्म्रूती जागृत झाल्या . आईच्या हातचे सगळे पदार्थ वेगळीच चव देतात. चला तर मग बघूया अशीच एक रेसिपी. Jyoti Chandratre -
आंब्याची गोड चटणी (Ambyachi Chutney Recipe In Marathi)
#MDR#मदर्स डे स्पेशल रेसिपीही गोड आंब्याची चटणी सुद्धा माझ्या आईच्या रेसिपी मधून आली आहे. Sushma Sachin Sharma -
कापण्या (kapnya recipe in marathi)
#ashr आषाढ विशेष रेसिपी क्र. 2आषाढात केला जाणारा आणखीन एक पदार्थ म्हणजे कापण्या. हा पण गव्हाच्या पिठाचा गूळ घालून केला जाणारा पौष्टिक पदार्थ आहे. Sujata Gengaje -
बाजरीच्या खारोड्या (सांडके) (bajrichya khrodya recipe in marathi)
#mdमदर्स डे स्पेशल आईच्या हातच्या चवीच्या खारोड्या बनवण्याचा मी प्रयत्न केला. चव तर छानच जमलीय व छान खुसखुशीत पण झाल्याय खारोड्या चला तर मग बघूया कशी झालीय ही रेसेपि . Jyoti Chandratre -
रताळ्याच्या घा-या (ratalyachya gharya recipe in marathi)
#md आईच्या हाताच्या घा-या मी आज बनवलेल्या आहेत, ती नाही पण तिने शिकवले ली ही रेसिपी आजही माझ्यासोबत आहे. Rajashree Yele -
पारंपरिक रव्याची गुळाची करंजी (Ravyachi Gulachi Karanji Recipe In Marathi)
#choosetocook या थीम साठी मी माझीपारंपरिक रव्याची गुळाची करंजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कोकोनट पुलाव (coconut pulao recipe in marathi)
#आई(मि बनवलेला कोकोनट पुलाव माझ्या आईला फार आवडते म्हणून मी मदर्स डे निमित्त ही रेसिपी शेअर केली) Naina Panjwani -
रैस्टोरेंट स्टाइल राजमा मसाला (Rajma Masala Recipe In Marathi)
#MDR#मदर्स डे स्पेशलमाझ्या आईच्या पाककृतींमधली भाजीची ही एक उत्तम रेसिपी आहे. Sushma Sachin Sharma -
मँगो मस्तानी (mango mastani recipe in marathi)
#mdआईच्या हातचे सर्व पदार्थ मला खूपच आवडतात. पण तिला मँगो मस्तानी खूप आवडते म्हणून मदर्स डे च्या साठी मी मँगो मस्तानी बनविली आहे. पुण्यामध्ये सुजाता मस्तानी खूप फेमस आहे. तिला ही मस्तानी खूप आवडतो. Suvarna Potdar -
आलू पराठा (aloo paratha recipe in marathi)
#cdy#आलूपराठाबाल दिवस रेसिपी चॅलेंज साठी खास आलू पराठा रेसिपी तयार केलीमाझ्या मुलीला सर्वात जास्त आवडीचा पदार्थ म्हणजे आलू पराठा तिला नेहमीच आलू पराठा खूप आवडतो ती केव्हाही आलू पराठा खाऊ शकते तिला नाश्त्यात जेवनात रात्रीच्या जेवणात आलू पराठा दिला तर ती आनंदाने खाते जवळपास तिला माझ्या हातचे सगळेच पदार्थ खूप आवडतात ती आवडीने खाते तसेच मलाही तिच्या हातचे बरेस पदार्थ आवडतात ती ही माझ्यासाठी नेहमी पदार्थ तयार करते. Chetana Bhojak -
गवार भाजी (gavar bhaji recipe in marathi)
#mdमाझ्या आईच्या हाताची गवारीच्या शेंगाची भाजी मला फार आवडती. kalpana Koturkar -
तांदळाचे लाडू (tandlache ladoo recipe in marathi)
आईच्या हातचे #Md" " माझ्या आईच्या हातचे मला तांदळाचे लाडू खुप आवडतात. आज पहिल्या दाच करून पाहिले.छानच झाले आहेत.माझ्या माहेरी पातळ पोहे चा चिवडा आणि हे तांदळाचे लाडू नेहमी घरात असतात. डब्बा खाली होत नाही तर आईचे लाडु , चिवडा तयार..असो. णी माझ्या आईच्या हातचे तांदळाचे लाडू ची रेसिपी दाखवते आहे. 👇😊 Archana Ingale -
खमंग रवा मेथी लाडू (khamang rava ladoo recipe in marathi)
#cooksnapआज मी ,Deepa Gad ताईंची रवा मेथी लाडू कुकस्नॅप केली आहे.खूपच टेस्टी आणि अप्रतिम झाले आहेत लाडू....😋😋Thank you so much tai for this delicious recipe...😊🌹 Deepti Padiyar -
रव्याची खीर (ravyachi kheer recipe in marathi)
#फोटोग्राफी#खीररव्याची खीर हा पदार्थ भारतात सगळ्या प्रांतात केला जातो. सणासुदीला नैवेद्याच्या ताटात, काही खास प्रसंगी जेवणाच्या ताटात पुरीबरोबर किंवा असंच कधीही स्वीट डिश म्हणून ही खीर केली जाते. रेसिपी अगदी सोपी आहे. बारीक रवा,दूध आणि साखर हे मुख्य जिन्नस लागतात आणि स्वादासाठी वेलची, केशर, सुका मेवा घातला जातो. Sudha Kunkalienkar -
गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
#md# आई ... माझा वाढदिवस म्हटलें की आईच्या हातचे गुलाबजाम ठरलेले.. कारण मला ते खूपच आवडतात. आजही आईची आठवण म्हणून मी हे गुलाबजाम केले आहेत. Priya Lekurwale -
-
तीळ-गुळाची पोळी (til gudachi poli recipe in marathi)
#मकर संक्रांतीला ही पोळी केली जाते. आमच्याकडे नेहमी ही पोळी संक्रांतीला केली जाते. Sujata Gengaje -
आंब्याच्या रसातला शिरा (mango shira recipe in marathi)
#आई माझ्या आईला आंब्याच्या सगळ्याच रेसिपी खूप आवडतात.त्यामुळे मदर्स डे निमित्त मी तिचा फेवरेट आंब्याच्या रसतला शिरा केला आहे . माझी आई पण हा खूप छान करते. आणि मी खूप लकी आहे की माझी ही ५० रेसिपी मी खास माझ्या आईसाठी सादर करते. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
व्हॅनिला कस्टर्ड स्पंग केक (Vanilla Custard Sponge Cake Recipe In Marathi)
#MDR#मदर्स डे स्पेशल रेसिपी ,फारॅ माई मदरजर मी आयुष्यात लक्ष देण्यासारखे काही केले असेल तर मला खात्री आहे की मला माझ्या आईकडून वारसा मिळाला आहे. Sushma Sachin Sharma -
भरली वांगी मसाला (bharli vangi masala recipe in marathi)
#mdमाझी आई सुगरण तर आहेच पण तिच्या हाताला चवही खूप आहे. मला आईच्या हातच्या सगळ्याच रेसिपी आवडतात तीच्या कडूनच मी बघुन बघुन अनेक रेसिपी शिकलेय. तिने बनवलेले सर्वच पदार्थ खूप आवडतात पण बुंदीचे लाडू अनारसे गव्हाच्या चिकाची गोडवडी भरलेली वांगी बटाट्याची भाजी पुरणपोळी तसेच नॉनव्हेज मध्ये ही चिकन, बांगडा फ्राय हे जास्त प्रिय आहे. माझे लग्न अठराव्या वर्षी झाले मी बहुतांश स्वयंपाक लग्न झाल्यावर शिकले परंतु ती ज्या पद्धतीने बनवायचे ते मी लहानपणापासून बघत आले आणि तिला मी स्वयंपाकात मदत ही करायची पण मी एकटीने कधी पूर्ण स्वयंपाक केला नव्हता पण ते माझं निरीक्षण आई कसं बनवायची त्या पद्धतीने मी लग्नानंतरही जेवण बनवत गेले.... तिच्याकडूनच मी अनारसे घरगुती मसाला गव्हाच्या गोड चिकवड्या कुरडया पापड इ.असे बरेच अवघड पदार्थ शिकले. तिच्या हातची अजून एक खासियत कांदा खोबरे मसाला हे सर्व भाज्यांची चव अजूनच वाढवते. माझ्या मुलांनाही तिच्या हातची बटाट्याची भाजी खूपच आवडते. मुलांच्या बरोबर मी कधीही माहेरी गेले की तिला ती बटाट्याची भाजी आवर्जून करायला सांगतात अशी माझी आई खूपच सुगरण आहे तिच्याच हातची मसाला भरलेली वांगी ही आम्हा सर्वांनाच खूप प्रिय आहे चला तर मग त्याची रेसिपी बघूया.... Vandana Shelar -
मसाले दार कडक चहा (kadak chai recipe in marathi)
#md आईच्या हातचा प्रेमाचा पण कडक चहा. आई मुलीनां शिकवते ,कपाच्या मापाने चहा. तोच कडक चहा आज मातृदिना निमीत्याने आई साठी करणार Suchita Ingole Lavhale -
रव्याची क्रिस्पी जिलेबी (rava jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 #जिलेबीमाझ्या घरी मी मैदा फार कमी वापरते.त्यामुळे जिलेबी करताना जास्त प्रमाणात रवा व कमी मैद्याचा वापर करून ही जिलेबी मी तयार केलेली आहे. ही जिलेबी सुद्धा खूप मस्त खुसखुशीत लागते. चला तर मग बघुया रव्याची क्रिस्पी जिलेबी. Shweta Amle
More Recipes
टिप्पण्या