कापण्या (kapnya recipe in marathi)

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

#ashr आषाढ विशेष रेसिपी क्र. 2
आषाढात केला जाणारा आणखीन एक पदार्थ म्हणजे कापण्या. हा पण गव्हाच्या पिठाचा गूळ घालून केला जाणारा पौष्टिक पदार्थ आहे.

कापण्या (kapnya recipe in marathi)

#ashr आषाढ विशेष रेसिपी क्र. 2
आषाढात केला जाणारा आणखीन एक पदार्थ म्हणजे कापण्या. हा पण गव्हाच्या पिठाचा गूळ घालून केला जाणारा पौष्टिक पदार्थ आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
4-5,जणांसाठी
  1. 1/2 कपगूळ
  2. 1/2 कपपाणी
  3. 1.5 कपगव्हाचे पीठ
  4. 1 टेबलस्पूनबेसन पीठ
  5. 1 टीस्पूनबडीशोप
  6. 1 टीस्पूनखसखस. आवडत असल्यास लावणे
  7. 1.5 टेबलस्पूनतेलाचे मोहन
  8. 2 चिमूटभरमीठ
  9. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    एका पातेल्यात गुळ व पाणी एकत्र करुन गॅसवर ठेवणे.त्याची गुळवणी करून घेणे. गूळ विरघळला की, गॅस बंद करावा. परातीत गाळणीने गाळून घ्यावे.म्हणजे गुळातील कचरा निघून जातो.

  2. 2

    गुळवणीत गव्हाचे पीठ, बेसन पीठ, मीठ, बडीशोप,कडकडीत तेलाचे मोहन घालून मिक्स करून घेणे.

  3. 3

    पिठ हाताने मध्यम घट्ट मळून घेणे. *पातळ झाल्यास थोडे गव्हाचे पीठ घालावे. *एकदम घट्ट झाल्यास पाण्याचा हात लावून थोडे मऊ करावे.झाकण ठेवून 20-25 मिनिटे ठेवावे. नंतर पुन्हा मळून घेणे व त्याचे समान भाग करून घ्यावेत.

  4. 4

    एक गोळा घेऊन पोळी जाडसर थोडी लाटून घेणे. त्यावर खसखस थोडी पसरवून घेणे. लाटण्याने पोळी लाटून घेणे. म्हणजे खसखस निघणार नाही.पोळी मध्यम जाडसर ठेवावी.*पातळ लाटू नये.सुरीने त्रिकोणी आकारात कापून घेणे. अशाप्रकारे सर्व कापण्या करून घेणे.

  5. 5

    गॅसवर कढईत तेल गरम करत ठेवावे. तेल जास्त तापवायचे नाही. कढईत जेवढया बसतील तेवढया कापण्या घालून घेणे व मंद आचेवर ठेवून लालसर तळून घ्यावे. अशाप्रकारे कापण्या तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes