खान्देश होळी स्पेशल लाडवे (Ladwe recipe in marathi)

Vaishali Dipak Patil
Vaishali Dipak Patil @vaishu

#hr "लाडवे " हा होळी स्पेशल खान्देशी पारंपरिक पदार्थ आहे. माझी आई नेहमी होळीला हा पदार्थ बनवते, मी आईकडून शिकले. आजच्या धकधकीच्या जीवनात आपण हे पारंपरिक पदार्थ विसरत चाललोय . आपली परंपरा जपण्याचा माझा हा प्रयत्न 🙏🙏

खान्देश होळी स्पेशल लाडवे (Ladwe recipe in marathi)

#hr "लाडवे " हा होळी स्पेशल खान्देशी पारंपरिक पदार्थ आहे. माझी आई नेहमी होळीला हा पदार्थ बनवते, मी आईकडून शिकले. आजच्या धकधकीच्या जीवनात आपण हे पारंपरिक पदार्थ विसरत चाललोय . आपली परंपरा जपण्याचा माझा हा प्रयत्न 🙏🙏

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४०मी
  1. १ वाटी गव्हाचे पीठ
  2. 1 वाटीगूळ
  3. 1/2 वाटीकिसलेले खोबरे
  4. मीठ चवीनुसार
  5. तेल
  6. 1 टीस्पूनवेलची पूड

कुकिंग सूचना

४०मी
  1. 1

    सर्व प्रथम आपण गव्हाचे पीठ थोडे मीठ घालून कणिक मळून घेऊ.

  2. 2

    कणकेचे गोळे बनवून घेऊ. आता गोळ्या ना पोळपाटावर हाताच्या बोटांनी जाड शेवया वळून घेऊ.

  3. 3

    या प्रमाणे सर्व लाडवे वळून घेऊ आणि त्यांना ४ते ५तास ऊन्हात वाळवून घेऊ. जरा आत मध्ये ओलसर राहू देऊ, आता त्याचे तुकडे करून घेऊ.

  4. 4

    वाळलेल्या लाडव्याचे तुकडे कढईत थोडे तेल तापवून लालसर भाजून घेऊ.

  5. 5

    आता कुकर मध्ये पाणी तापवुन त्यात भाजलेले लाडवे शिजवून घेऊ. कुकर चे झाकण लावून २ते ३ शिट्या घ्याव्या.

  6. 6

    लाडवे छान शिजले की त्यात बारीक चिरलेला गूळ घालावा व मिक्स करून घ्यावे. १०ते १५ मी. मध्यम आचेवर गुळात शिजू द्यावे.

  7. 7

    शिजल्यावर त्यात वेलची पूड, किसलेले खोबरे घालून मिक्स करावे. आपले मस्त गरमा गरम लाडवे तयार आहेत वाढतांना वरून थोडे किसलेले खोबरे घालून सर्व्ह करावे. थोडा वेळ घेणारा पदार्थ आहे पण खूप खूप छान लागतो 😋😋😋आणि आपले पूर्वज जिभेचे चोचले पुरविण्यासाठी काय करत हा विचार मनात येतो....
    टीप: आपण यात दूध घालून किवा तूप घालून खाऊ शकता.
    Please try 🙏
    धन्यवाद....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vaishali Dipak Patil
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes