धोप्याच्या पानाची वडी (अळुवडी) (alu wadi recipe in marathi)

Suchita Ingole Lavhale
Suchita Ingole Lavhale @cook_26220149

#Ks3 विदर्भ स्पेशल धोप्याच्या पानाची खमंग वडी खासीयत

धोप्याच्या पानाची वडी (अळुवडी) (alu wadi recipe in marathi)

#Ks3 विदर्भ स्पेशल धोप्याच्या पानाची खमंग वडी खासीयत

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धातास
२व्यक्ती
  1. धोप्याचे पान
  2. 1 कप बेसन
  3. 1 टीस्पून तिखट
  4. 1/2 टीस्पून हळद
  5. चवीला मीठ
  6. 2-3 टीस्पून दही
  7. 1/2 टीस्पून तिळ
  8. 1/2 टीस्पूनओवा
  9. 1/2 टीस्पूनअद्रक लसुन पेस्ट
  10. कोथींबीर

कुकिंग सूचना

अर्धातास
  1. 1

    प्रथम पान स्वच्छ धुवून पुसुन घेतले. बेसन घेऊन त्यात तिखट मीठ,हळद,धनेपुड,ओवा,अद्रकलसुन पेस्ट,दही,कोथींबीर पावडर,तिळ,ओवा टाकुन भिजवुन घेतल.

  2. 2

    आता बेसन साधारण घट्ट भिजवल.चाळणीला तेल लावल. एक एकावर बेसन लावुन पान ठेवत गेवे.

  3. 3

    पानाला बेसन लावुन घड्या करत गेले. आता घडी करुन वडी तयार झाली. चाळणीवर ठेवली.

  4. 4

    गॕसवर गंजात पाणी गरम करायला ठेवल. त्यावर चाळणी ठेवली.झाकण ठेवुनवाफवायला ठेवल.पंधरा ते वीस मिनीटात वडी वाफवुन तयार झाली. थंड करायला ठेवली.

  5. 5

    आता वड्या पाडुन,वड्या तेलात तळुन घेतल्या. वड्या सर्व्ह करायला तयार झाल्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Suchita Ingole Lavhale
Suchita Ingole Lavhale @cook_26220149
रोजी

टिप्पण्या (3)

Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07
मस्त झपाट्याने डीश सुरू आहे छान👌👌

Similar Recipes