नागपुरची सांबार वडी/ पुडाची वडी/ खमंग आणि खुसखुशीत सांबार वडी (sambhar vadi recipe in marathi)

Gital Haria
Gital Haria @cook26291494
Malegaon

# KS3
# नागपुरची सांबार वडी
झटपट आणि खमंग खुसखुशीत अशी होणारी सांबारवडी....

नागपुरची सांबार वडी/ पुडाची वडी/ खमंग आणि खुसखुशीत सांबार वडी (sambhar vadi recipe in marathi)

# KS3
# नागपुरची सांबार वडी
झटपट आणि खमंग खुसखुशीत अशी होणारी सांबारवडी....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

तीस मिनिट
दोन व्यक्ती
  1. 1 कपबारीक चिरलेली कोथिंबीर
  2. 1/2 कपसुका खोबरा किसलेला
  3. 1/2 कपशेंगदाण्याचे कूट
  4. 1 टेबलस्पूनशेंगदाणे दोन भाग केले
  5. 1/2 टेबलस्पूनखसखस
  6. 1 टेबलस्पूनपांढरे तीळ
  7. 1 टेबलस्पूनतेल फोडणी करण्यासाठी
  8. 1/2 टीस्पूनजीरे
  9. 1/2 टीस्पूनबडीशोप
  10. 1/4 टीस्पूनहिंग
  11. 1/2 टीस्पूनहळद
  12. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  13. 1/2 टेबलस्पूनधने पावडर
  14. 1/2 टेबलस्पूनगरम मसाला
  15. 1 टीस्पूनसाखर
  16. 1/2लिंबाचा रस
  17. चवीनुसारमीठ
  18. पीठ मळून घेण्यासाठी
  19. 1/2 कपमैदा
  20. 1/4 कपबेसन पीठ
  21. चवीनुसारमीठ
  22. 1/2 टीस्पूनलाल तिखट
  23. 1/4 टीस्पूनहळद
  24. 1/4 टीस्पूनगरम मसाला
  25. 1/8 टी स्पूनओवा
  26. 2 टेबलस्पूनतेलाचं मोहन
  27. पीठ मळण्यासाठी आवश्यकतेनुसार पाणी

कुकिंग सूचना

तीस मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम एका परातीत मैदा बेसन आणि सर्व मसाले टाकून घट्ट पीठ मळून घ्या.

  2. 2

    त्यानंतर एका कढईमध्ये शेंगदाणे शेकून घ्या शेंगदाण्याच्या थोडी साल काढून घ्या. मिक्सरमध्ये शेंगदाणा कूट तयार करा आणि थोडे दाणे अर्धी राहू द्या.

  3. 3

    एकीकडे कढई गरम करा त्यामध्ये तेल जीरे हिंग हळद बडिशोप आणि खसखस आणि तीळ घाला

  4. 4

    त्यानंतर किसलेलं खोबरं दाण्याचं कूट अर्धी दाणे सर्व परतून घ्या गुलाबी रंग आल्यावर

  5. 5

    सर्व मसाले टाका व्यवस्थित मिक्स करून घ्या त्यानंतर कोथिंबीर टाका अर्धा मिनिट परतून घ्या आणि गॅस बंद करा

  6. 6

    हे सारण थंड होऊ द्या तयार केलेल्या पिठाची पारे लाटून घ्या

  7. 7

    पुरीपेक्षा थोडी मोठी पारी लाटून मध्यभागी सारण ठेवा आणि आजूबाजूला पाणी लावून पहिले दोन्ही बाजूंनी वाळू घ्या आणि नंतर साईटच्या कडा बंद करा

  8. 8

    एकाबाजूला तेलाची कढई गरम करायला ठेवा. तेल छान गरम झाल्यावर सांभार वडी स्लो 2 मीडियम गॅस वर गुलाबी रंगाची खरपूस सांबर वडी तळून घ्या

  9. 9

    मस्त गरमागरम सांबर वडी तयार आहे मी माझ्या मुलाला सॉस सोबत खायला दिल आहे...

  10. 10

    तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मसाला ताक, हिरवी चटणी तुम्ही कशा सोबत पण खाऊ शकतात....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Gital Haria
Gital Haria @cook26291494
रोजी
Malegaon

टिप्पण्या (6)

Similar Recipes