मँगो पराठा (mango paratha recipe in marathi)

Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
Vashi

#amr
आंबा महोत्सव.
आंब्याचे कितीतरी प्रकार करता येतात. त्यातलाच मँगो पराठा. माझी मुलगी दिल्लीला जॉब करायची त्यावेळी मी बरेचदा तिच्याकडे जात असे. आम्ही दोघी तिथे खूप मज्जा करायचो. हॉटेलिंग आणि शॉपिंग. दिल्लीतले खाण्याचे एकही ठिकाण आम्ही सोडले नाही. पराठेवाला गल्ली मध्ये विविध प्रकारचे पराठे मिळतात. त्यात मला तिथला रबडी पराठा खूपच आवडायचा. मग मी थोडा बदल करून आंबा घालून पराठा करून पहिला आणि तो इतका मस्त झाला की काही विचारू नका. मी बरेचदा असा पराठा बनवते. आज लग्नाचा वाढदिवस आहे. आणि म्हणून आज मी हे पराठे केले आहेत सांगा कसे झालेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मिनिटे
4 व्यक्तींसाठी
  1. आतील सारणासाठी साहित्य
  2. 1 कपआमरस
  3. 1/2 कपमिल्क पावडर
  4. 1/2 कपघट्ट साईसकट दूध
  5. 2 टेबलस्पूनसाखर
  6. 1 टेबलस्पूनपिस्त्याचे काप
  7. पराठ्याचे साहित्य
  8. 1 कपमैदा
  9. 1 कपरवा
  10. 1 कपगव्हाचे पीठ
  11. 2 टेबलस्पूनतूप
  12. चिमूटभरमीठ
  13. वरून तव्यावर लावायला तूप
  14. आवश्यक तेवढे पाणी

कुकिंग सूचना

40 मिनिटे
  1. 1

    सर्व पीठे एकत्र करून त्यात चिमूटभर मीठ घालावे. तूप सर्व पिठांना चोळून मग पुरी सारखे घट्ट मळून घ्यावे. अर्धा तास बाजूला झाकून ठेवा.

  2. 2

    गॅसवर मध्यम आचेवर पॅन ठेवून त्यात आंब्याचा रस घेऊन ढवळून घ्यावे.

  3. 3

    रस थोडा घट्ट झाला की त्यात साखर, साईसकट दूध व मिल्क पावडर घालून तळापासून हलवत रहावे. त्यात पिस्त्याचे काप घालावे. सर्व मिक्स करून गॅस बंद करावा.

  4. 4

    मळलेल्या पिठाचे दोन गोळे लाटून घ्यावे. त्यातल्या एकावर तयार केलेले रसाचे मिश्रण पसरवावे. वरून दुसरी लाटलेली पोळी ठेवून सर्व बाजूने बंद करून घ्यावी.

  5. 5

    तव्यावर भरपूर तूप लावून दोन्ही बाजूनी पराठा छान भाजून घ्यावा.. मँगो पराठा तयार. आमरसा बरोबर किंवा दुधा बरोबर सर्व करावा.

  6. 6
  7. 7
  8. 8
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
रोजी
Vashi
मला पदार्थ बनवायला आणि खिलवायला आवडते.
पुढे वाचा

टिप्पण्या (7)

Similar Recipes