जळगावी वांग्याचं भरीत (vangyach bharit recipe in marathi)

सुप्रिया घुडे
सुप्रिया घुडे @cook_SupriyaGhude97
वसई

#KS4 महाराष्ट्राचे किचन स्टार : थीम ४ : खान्देश साठी मी दुसरी पाककृती सादर करत आहे - जळगावी वांग्याचं भरीत. यासाठी खास जळगावी हिरवी वांगी वापरली जातात आणि कांद्याच्या पातीचा वापर केला जातो. सध्या lockdown मुळे मला कांद्याची पाट मिळाली नाही म्हणून ती वापरली नाहीयेत.

जळगावी वांग्याचं भरीत (vangyach bharit recipe in marathi)

#KS4 महाराष्ट्राचे किचन स्टार : थीम ४ : खान्देश साठी मी दुसरी पाककृती सादर करत आहे - जळगावी वांग्याचं भरीत. यासाठी खास जळगावी हिरवी वांगी वापरली जातात आणि कांद्याच्या पातीचा वापर केला जातो. सध्या lockdown मुळे मला कांद्याची पाट मिळाली नाही म्हणून ती वापरली नाहीयेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
4 सर्व्हिंग्ज
  1. 2-3 भरिताची वांगी
  2. 2 चमचेशेंगदाणे
  3. 1मोठा कांदा
  4. लसूण चा एक कांदा
  5. 2हिरव्या मिरच्या
  6. भरडलेले धणे किंवा धणे पावडर
  7. 1 चमचाकाळा मसाला
  8. 2 चमचेखाद्य तेल
  9. 1 टीस्पूनहळद, मोहरी, हिंग फोडणीकरिता
  10. चवीपुरतं मीठ

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    वांग्यांना काटे चमच्याने टोचून ती गॅसवर भाजून घेतली. वरची जळलेली साल काढून टाकली.

  2. 2

    भाजलेली वांगी मीठ टेकवून मॅश करून घेतली. मिरच्या-लसूण जाडसर वाटून घेतल्या. कान्दा बारीक चिरून घेतला.

  3. 3

    कढईत तेल तापवून त्यात शेंगदाणे भाजून / तळून घेतले.

  4. 4

    त्याच कढईत अजून थोडं तेल तापवून मोहरी-हिंगाची फोडणी दिली. त्यात मिरची-लसणाचं वाटण परतून घेतलं. कांदा गुलाबीसर होईपर्यंत परतला. धणे पावडर आणि १ चमचा काळा मसाला घातला.

  5. 5

    मॅश केलेलं वांग घालून सगळं मिश्रण एकजीव करून झाकण घालून १ मिनिटं शिजवलं.

  6. 6

    नंतर मीठ, भाजलेले दाणे घातले. अजून एखाद मिनिट शिजवून गॅस बंद केला.

  7. 7

    अशा या चविष्ट भरिताचा भाकरी सोबर आस्वाद घ्यायचा :)
    ~ सुप्रिया घुडे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
सुप्रिया घुडे
रोजी
वसई
🇮🇳👰Independent Women👩🏻‍💻Software Programmer👯Traveller👸Explorer👰Foodie👱Artist📖Book Lover / Reader📝Lifetime Learner🇮🇳
पुढे वाचा

Similar Recipes