जवळा पाव (javla pav recipe in marathi)

सुप्रिया घुडे
सुप्रिया घुडे @cook_SupriyaGhude97
वसई

मालवणी जत्रा म्हणलं कि त्यात कोकणी पदार्थ आलेच. मला मालवणी जत्रेत गेल्यावर तिथला जवळा पाव नाही खाल्ला कि बेचैन होतं :-P
#KS6 महाराष्ट्राचे किचन स्टार : थीम ६ : जत्रा फूड साठी मी मालवणी जत्रेतील एक पदार्थ - पहिली पाकाकृती म्हणून सादर करत आहे - जवळा / कोलीम पाव.

जवळा पाव (javla pav recipe in marathi)

मालवणी जत्रा म्हणलं कि त्यात कोकणी पदार्थ आलेच. मला मालवणी जत्रेत गेल्यावर तिथला जवळा पाव नाही खाल्ला कि बेचैन होतं :-P
#KS6 महाराष्ट्राचे किचन स्टार : थीम ६ : जत्रा फूड साठी मी मालवणी जत्रेतील एक पदार्थ - पहिली पाकाकृती म्हणून सादर करत आहे - जवळा / कोलीम पाव.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
२ व्यक्तींसाठी
  1. 2 वाट्याकोलीम / जवळा
  2. 1कांदा
  3. 1टोमॅटो
  4. लसूण पाकळ्या
  5. 2हिरव्या तिखट मिरच्या
  6. 1/2 वाटीकोथिंबीर
  7. 4-5आमसुलं
  8. 5-6कढीपत्ता पाने
  9. तेल
  10. 3 चमचेलाल तिखट मसाला
  11. 1 चमचाकाळा मसाला
  12. 1 चमचाकायस्थ मसाला (ऐच्छिक)
  13. 1 चमचाजीरे पावडर
  14. 1 चमचाधणे पावडर
  15. 1 चमचागरम मसाला
  16. चवीपुरतं मीठ
  17. 2लादी पाव
  18. 4-5 चमचेशेजवान चटणी

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    २ वाट्या कोलीम / जवळा स्वच्छ ३-४ वेळा पाण्यात धुवून घेतला.

  2. 2

    १ कांदा, १ टोमॅटो, लसूण पाकळ्या, २ हिरव्या तिखट मिरच्या, अर्धी वाटी कोथिंबीर बारीक चिरून घेतले.

  3. 3

    कढईत तेल गरम करून त्यात ५-६ कढीपत्ता पाने, जिऱ्याची फोडणी दिली. त्यात चिरलेला कांदा, टोमॅटो, लसूण, मिरच्या, परतून शिजवून घेतले.
    त्यानंतर त्यात ३ चमचे लाल तिखट मसाला, १ चमचा काळा मसाला, १ चमचा कायस्थ मसाला, १ चमचा जीरे पावडर, १ चमचा धणे पावडर आणि चवीपुरतं मीठ घालून सगळं मिश्रण ढवळून घेतलं. झाकण ठेवून वाफेवर मुरू दिलं.

  4. 4

    आता यात निथळलेले कोलीम, ४-५ आमसुलं आणि १ चमचा गरम मसाला घालून झाकण ठेवून शिजवून घेतलं.

  5. 5

    कोलीम शिजल्यावर चिरलेली कोथिंबीर पसरून गॅस बंद करून ठेवला.

  6. 6

    तव्यावर थोडं तेल गरम करून त्यावर लादी पाव मधून कट करून परतून घ्यायचे.
    परतलेल्या लादी पाव ना आतून शेजवान चटणी लावून घ्यायची.

  7. 7

    तयार कोलीम पावात भरून पुन्हा तव्यावर थोडा वेळ दाबेली सारखे परतून घ्यायचे. गरम गरम जवळा पाव तयार :)
    ~ सुप्रिया घुडे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
सुप्रिया घुडे
रोजी
वसई
🇮🇳👰Independent Women👩🏻‍💻Software Programmer👯Traveller👸Explorer👰Foodie👱Artist📖Book Lover / Reader📝Lifetime Learner🇮🇳
पुढे वाचा

Similar Recipes