खानदेशी डाळ,मेथ्याची भाजी/आमटी (methichi bhaji recipe in marathi)

Pooja Katake Vyas
Pooja Katake Vyas @pooja_cookbook
Mumbai

#KS4
खानदेशी डाळ ,मेथ्याची भाजी/आमटी ही मेथी दाणे वापरून केली जाते ,मेथी दाने चवीला कडू असून देखील ही भाजी कडसर लागत नाही , तसेच ही डाळ तुम्ही भाजी म्हणून देखील व आमटी म्हणून देखील पोळी,भाकरी व भात दोन्ही सोबत खाऊ शकता .मेथीचे दाणे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत ,तर मग बघूयात रेसिपी ...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीतूर डाळ
  2. 4 चमचेमेथी दाने
  3. 1कांदा
  4. 6-7लसूण पाकळ्या
  5. 1/2 इंचआलं
  6. 1 चमचालाल तिखट
  7. 1 चमचाहळद
  8. 1 चमचागरम मसाला
  9. मीठ चवीनुसार
  10. फोडणीसाठी
  11. तेल,
  12. 1 चमचाजीरे ,
  13. 1 चमचामोहरी,
  14. 4-8 कडीपत्ता,
  15. 1 चमचाहींग
  16. पाणी आवश्यकत्यानुसार
  17. 20 ग्रॅमखोबरं
  18. 1टोमॅटो

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    सर्व साहित्य एकत्र करून घ्या,कुकरमध्ये डाळ 2 शिट्या करून शिजवून घ्या,एक कढई गॅसवर ठेवून त्यात कांदा, खोबरं काप, लसूण,आलं भाजून घ्या

  2. 2

    मग ते सर्व थंड झाले की मिक्सरमध्ये वाटून घ्या,कढई मध्ये फोडणी करून घ्या त्यात मेथी दाणे,टोमॅटो टाकून परतुन घ्या,मग त्यात मिक्सरमध्ये वाटलेलं वाटण घाला व हलवुन घ्या

  3. 3

    मग त्यात लाल तिखट, हळद,मीठ,गरम मसाला घाला व हलवुन घ्या मग त्यात शिजवलेली डाळ न घोटता घाला व सगळं हलवुन घ्या हवं तेवढं थोडं गरम पाणी घाला,एक उकळी येवू द्या

  4. 4

    तयार खानदेशी डाळ,मेथ्याची भाजी/आमटी कोथिंबीर घालून सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pooja Katake Vyas
Pooja Katake Vyas @pooja_cookbook
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes