मराठवाडा स्पेशल कढी (kadhi recipe in marathi)

Supriya Devkar
Supriya Devkar @cook_1983
Solapur

#KS5 मराठवाडा म्हटलं धुळे, जालना परभणी हा भाग आठवतो या भागात काही वेगळे पदार्थ आहेत जे आपला ठसा ऊमटवतात त्यात सुशिला,निलंगा भात, बोरिवरी वरण असे पदार्थ येतात. इकडे कढी, कढीगोळे ही बनवले जातात पण इकची कडी काहीशी तिखट असते.चला तर मग बनवूयात कढी

मराठवाडा स्पेशल कढी (kadhi recipe in marathi)

#KS5 मराठवाडा म्हटलं धुळे, जालना परभणी हा भाग आठवतो या भागात काही वेगळे पदार्थ आहेत जे आपला ठसा ऊमटवतात त्यात सुशिला,निलंगा भात, बोरिवरी वरण असे पदार्थ येतात. इकडे कढी, कढीगोळे ही बनवले जातात पण इकची कडी काहीशी तिखट असते.चला तर मग बनवूयात कढी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20मिनिट
4वाटी
  1. 200 मि.लि.ताक
  2. 2 टेबलस्पूनबेसन
  3. 6-7पाकळ्या लसूण
  4. 2 तुकडेआलं
  5. 6-7पान कढीपत्ता
  6. गुळ खडा किंवा साखर
  7. 1/2 टीस्पूनहळद
  8. 1/2 टीस्पूनमेथी दाणे
  9. 1/2 टेबलस्पूनजीरे मोहरी
  10. हिंग चिमटभराला
  11. 2 टेबलस्पूनतेल
  12. 2हिरव्या मिरच्या
  13. कोथिंबीर
  14. मीठ चवीनुसार
  15. 1/2 टेबलस्पूनधने जीरे पूड

कुकिंग सूचना

20मिनिट
  1. 1

    सर्व प्रथम ताक घ्यावे आणि त्यात बेसन पीठ घालून हलवून घ्यावे. सोबत हळद घालून घ्यावे.

  2. 2

    मीठ चवीनुसार घालावे कोथिंबीर चिरून घालावी व सगळे एकजीव करावे

  3. 3

    आता फोडणी चे साहित्य घ्या आणि कढईत तेल गरम करत ठेवावे.जीरे, मोहरी तडतडल्यावर त्यात हिंग घालून घ्या. आता आले लसूण पेस्ट करून घालावेत व चांगले भाजून घ्यावे. मराठवाड्यातील लोकं तिखट खातात ते मिरची चेचून घालतात कढीत. मी मिरचीचे काप घातले आहेत.

  4. 4

    सर्व मसाला चांगला परतला की त्यात बेसन असलेले ताक हळूहळू ओतत हलवावे. वरून थोडे पाणी घालून चांगले हलवावे. आता त्यात जीरे धने पूड घालावी व पुन्हा फेटावे. मंद गॅसवर मोहर येईपर्यंत उकळी येऊ द्यावी आता गॅस बंद करावा. तयार आहे कढी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Supriya Devkar
Supriya Devkar @cook_1983
रोजी
Solapur
cooking is my hobby. I like to cook new dishes. I like to innovate recipes.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes