दम आलू काश्मिरी (dum aloo kashmiri recipe in marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#pe #एग अॅंड पोटॅटो #दम_आलू_काश्मिरी...फळ भाज्यांचा राजा बटाटा... बटाट्याला राजा म्हटलेले आहे.. का म्हणून काय विचारता.. अहो पदोपदी आपल्याला या फळभाज्याच्या राजाची आवश्यकता भासते.. राजा जसे प्रजेचे हित बघतो, त्यांना अडीअडचणीला मदत करतो, त्यांना संकटातून बाहेर काढतो त्याच पद्धतीने बटाटा हा राजा गृहिणींच्या तत्पर सेवेला हजर असतो .. राजाचे जसे आपल्या प्रजेकडे डोळ्यात तेल घालून लक्ष असते.. तसेच बटाटा आपल्या असंख्य डोळ्यांनी त्याच्या प्रजेवर बारीक लक्ष ठेवून असतो..🤩मला इथे एक लहानपणीच्या गाण्याच्या दोन ओळी आठवतात "बटाट्या बटाट्या तुला डोळे किती, पाहात राहिलास तर वाटते भीती" तर असा हा आपला सर्वांचा लाडका राजा.. बरं ह्याचे प्रधानजी आणि सेनापती कोण आहे तुम्हाला माहिती आहे का.. ते पण आपल्या स्वयंपाक घरात आपल्या दिमतीला हजर असतात बटाटा राजांबरोबर.. बरोबर ओळखलंत.. लालबुंद टोमॅटो म्हणजे प्रधानजी आणि सगळ्यांच्या डोळ्यातून पाणी काढणारा कांदा म्हणजेच सेनापती.. असे हे त्रिकूट स्वयंपाक घरात ओट्यावर जमले की शत्रुपक्ष नामोहरम झालाच म्हणून समजा.. काय म्हणताय कळलं नाही.. थांबा सांगते.. घरातील गृहिणी सोडून इतर सर्व जण मेंबर्स जे काही भाज्यांना, काही पदार्थांना अगदी नाक मुरडतात ..तोच हा शत्रू पक्ष.. पण बरं का महाराजा.. आपली गृहिणी पण काही कमी नसते ..ती पण सर्वांना नाक मुठीत ठेवून शरण यायला भाग पाडते.. आता इथे राज्याचे हे जे त्रिकूट आहे ते गृहिणीच्या मदतीला धावते.. आणि मग हे सर्वजण मिळून असा काही रुचकर खमंग पदार्थांची व्यूहरचना रचून strategy आखतात की समोरचा शत्रुपक्ष पूरा flat.. पार पांढरं निशाण फडकावून गृहिणी पुढे शरणागती पत्करतो आणि मग ही गृहिणी या त्रिकुटाचा कडे बघत विजयी हास्याची सलामी देते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25-30मिनीटे
4जणांना
  1. 15-20बेबी पॉटेटो
  2. 2टॉमेटो
  3. 1/2 कपअदमुरं दही
  4. 1 टेबलस्पूनलाल मिरची पावडर
  5. 1/2 टीस्पूनहळद
  6. 1 टेबलस्पूनगरम मसाला
  7. 12-15काजू
  8. 4-5बदाम
  9. 1 टेबलस्पूनखसखस
  10. 2-4लवंगा
  11. 2-3काळे मिरे
  12. 2वेलची
  13. 1 छोटादालचीनी चा तुकडा
  14. 5-6हिरव्या मिरच्या
  15. 1आल्याचा तुकडा
  16. मीठ (चवीनुसार)
  17. 4 टेबलस्पूनतेल
  18. 2 टेबलस्पूनकोथिंबीर
  19. 1 टेबलस्पूनकसूरी मेथी
  20. 2कांदे
  21. 7-8लसूण पाकळ्या
  22. 1 टीस्पून धणे पावडर
  23. 1/2 टीस्पूनजीरे पावडर
  24. 1 टीस्पूनबडीशोप
  25. 1 टेबलस्पूनकाश्मिरी लाल तिखट
  26. 1 टीस्पूनसाखर
  27. गरम पाणी

कुकिंग सूचना

25-30मिनीटे
  1. 1

    प्रथम सर्व बटाटे स्वच्छ धुऊन त्याची साले काढून घ्यावी नंतर हे सर्व बटाटे कुकरमध्ये ठेवून एक शिट्टी करावी कुकर चे झाकण उघडल्यावर या बटाट्यांना सुरीने किंवा फोर्कने टोचे मारावे. आणि गरम तेलात खमंग सोनेरी रंगावर तळून घ्यावेत.

  2. 2

    एकीकडे सर्व साहित्य एका ठिकाणी जमा करून द्या कांदा टोमॅटो बारीक चिरून घ्या.

  3. 3

    आता मिक्सरच्या भांड्यात कांदा टोमॅटो आलं-लसूण काजू बदाम खसखस मिरच्या बडिशोप घालून थोडे पाणी घालून या सर्वांची बारीक पेस्ट करून घ्या.

  4. 4

    आता बटाटे तळून जी तेल उरते त्या तेलातच आपल्याला पुढची भाजी करायची आहे.एका कढईत थोडे तेल तापवून घ्या तेल तापले की जीरे हिंग यांची खमंग फोडणी करून घ्या नंतर यामध्ये लवंग मिरे दालचिनी तमालपत्र घालून व्यवस्थित परतून घ्या नंतर यामध्ये वाटलेलं वाटण घाला. आणि चांगले परतून घ्या तेल सुटले पाहिजे आता यामध्ये हळद तिखट काश्मिरी लाल तिखट गरम मसाला धने जीरे पावडर थोडी कोथिंबीर चवीनुसार मीठ साखर घालून सर्व मसाले व्यवस्थित परतून घ्याा आणि आणि झाकण ठेवून तीन-चार वाफा काढाव्यात. नंतर आवश्यकतेनुसार गरम पाणी घाला

  5. 5

    आता या ग्रेव्ही मध्ये दही घालून पुन्हा व्यवस्थित ढवळा आणि झाकण ठेवून दोन-तीन वाफा येऊ द्याा. आता या वरील ग्रेव्ही मध्ये तळलेले बटाटे अलगद घालून हलक्या हाताने ढवळा.

  6. 6

    आता या भाजीमध्ये कसुरी मेथी आणि कोथिंबीर घालून भाजी अलगट ढवळा त्यावर झाकण ठेवून मंद आचेवर तीन ते चार मिनिटे भाजी शिजवून घ्या तयार झाले आपले चमचमीत काश्मीरी दम आलू

  7. 7

    एका डिश मध्ये किंवा बाऊलमध्ये दम आलू काश्मिरी काढू घेऊन त्यावर वरून कोथिंबीर पेरून पोळी फुलका पराठा नान किंवा भात याबरोबर सर्व्ह करा.

  8. 8
  9. 9
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

Similar Recipes