रेवडी (Revadi recipe in marathi)

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

#KS6 थीम:6 जत्रा स्पेशल
रेसिपी क्र.2
जत्रेत गुडीशेव सोबत रेवडी ही असतेच. संक्रांतीला सुद्धा रेवडी केली जाते. तीळ आणि गूळ शरीरासाठी आवश्यक असते.
ही रेसिपी मी फेसबुक कूकपॅड मराठीवर लाईव्ह दाखवली.

रेवडी (Revadi recipe in marathi)

#KS6 थीम:6 जत्रा स्पेशल
रेसिपी क्र.2
जत्रेत गुडीशेव सोबत रेवडी ही असतेच. संक्रांतीला सुद्धा रेवडी केली जाते. तीळ आणि गूळ शरीरासाठी आवश्यक असते.
ही रेसिपी मी फेसबुक कूकपॅड मराठीवर लाईव्ह दाखवली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20-25 मिनिटे
2-3 जणांसाठी
  1. 1/2 कपगूळ
  2. 1/2 कपतीळ
  3. 1/4 कपपाणी
  4. 1 टीस्पूनतूप

कुकिंग सूचना

20-25 मिनिटे
  1. 1

    गॅसवर कढई तापत ठेवावी.त्यात गूळ व पाणी घालून घेणे. गूळ वितळेपर्यंत गॅस मध्यम आचेवर ठेवावा.

  2. 2

    उकळी आली व वरती बुडबुडे दिसू लागले की,गॅस मंद आचेवर ठेवून पाक आटू दयावा.

  3. 3

    एका वाटीत थोडे पाणी घालावे.त्यात गुळाचा पाक घालून बघावा. बोटांनी गोळा झाला की, नाही ते पाहणे. गोळी बंद पाक झाला की गॅस बंद करावा.ताटलीला तूप लावून घेणे.

  4. 4

    त्यात पाक ओतून घेणे. ताट हाताने फिरवून पाक थोडासा थंड करून घेणे. जास्त थंड ही करायचा नाही.लगेच गोळा करायला घ्यायचा. हाताला तूप लावून घेणे, म्हणजे चटका जास्त बसणार नाही.

  5. 5

    गोळा होत आला की, लगेच दोन्ही हातांनी गोळा ओढून घ्यायचा व्हिडिओत दाखविल्याप्रमाणे. रंग बदलेपर्यंत. पांढरा रंग आला की,त्याचा मोठा रोल जाडीला बारीक असा करून घेणे व 3-4 मिनिटे तसाच ठेवावा.

  6. 6

    तोपर्यंत तीळ 3-4 मिनिटे नुसते गरम करून घेणे. रोल चे सुरीने बारीक तुकडे करून घेणे.

  7. 7

    गॅसवर पॅन गरम करत ठेवावा. गॅस मंद आचेवर ठेवून त्यात तीळ घालून घेणे. म्हणजे जळणार नाही. त्यात तुकडे घालून घेणे व चमच्याने तुकड्यांना तीळ लावून घेणे. चिवड्याच्या झाऱ्यात तयार रेवडी त्यात घालून, हलवावे. म्हणजे ज्यादाचे तीळ निघून जातील.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
रोजी

टिप्पण्या (2)

Similar Recipes