गोड शेव (god sev recipe in marathi)

Shilpa Pankaj Desai
Shilpa Pankaj Desai @cook_29394142
UAE

#ks6
जत्रेत मिळणारी "गोडी शेव" करताना आज लहानपणीच्या असंख्य आठवणी ताज्या झाल्या. आता इकडे परदेशात असे पदार्थ बघायला मिळणे कठीणच. आज कुकपॅडच्या जत्रा थीमच्या निमीत्ताने 'गोडी शेव' केली. मुलांनाही खुप आवडली, करण्यासाठी सोपी, साधी अशी ही गोडी शेव.......

गोड शेव (god sev recipe in marathi)

#ks6
जत्रेत मिळणारी "गोडी शेव" करताना आज लहानपणीच्या असंख्य आठवणी ताज्या झाल्या. आता इकडे परदेशात असे पदार्थ बघायला मिळणे कठीणच. आज कुकपॅडच्या जत्रा थीमच्या निमीत्ताने 'गोडी शेव' केली. मुलांनाही खुप आवडली, करण्यासाठी सोपी, साधी अशी ही गोडी शेव.......

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2 वाट्याबेसन
  2. 1 वाटीगुळ
  3. तळण्यासाठी तेल
  4. 1 टीस्पूनबडीशोप
  5. 1 टीस्पूनलाल रंग

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम बेसनमधे तेलाचे मोहन घालून पीठ घट्ट मळून घ्यावे. 10 मिनीट झाकून ठेवावे.

  2. 2

    नंतर हाताने लांब जाड शेव वळुन तीचे तुकडे करून तेलामधे मध्ये मंद आंचेवर शेव तळून घ्यावे.

  3. 3

    एका पॅनमधे गुळ गरम करून याचा पाक करून घ्यावा. या पाकामध्ये लाल रंग व बडीशोप घालावी. ही गोडी शेव
    लाल रंगाची असते. आता या पाकामध्ये तळलेली शेव घालून सगळीकडून गुळ व्यवस्थित लागेल असे हलवत रहावे.

  4. 4

    थोडेसे गरम असतानाच शेव सुटी करून घ्या. तयार आहे जत्रेत मिळणारी गोडी शेव....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shilpa Pankaj Desai
Shilpa Pankaj Desai @cook_29394142
रोजी
UAE
वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे !सहज हवन होते नाम घेता फुकाचे !!जीवन करी जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म !उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म !!
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes