कांदा पोहे (kanda pohe recipe in marathi)

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

आज ७ जून जागतिक पोहे दिन. जो विश्व पोहे दिवस म्हणून साजरा केला जातो.
पोहे रोजचा व सर्वांना आवडणारा नाष्टयाचा पदार्थ आहे. कुठे ही सहज मिळणारा पदार्थ.
७ जून २०१५ पासून या दिवसाला सुरूवात झाली. पोहे विविध पदार्थ वापरून बनवले जातात.

कांदा पोहे (kanda pohe recipe in marathi)

आज ७ जून जागतिक पोहे दिन. जो विश्व पोहे दिवस म्हणून साजरा केला जातो.
पोहे रोजचा व सर्वांना आवडणारा नाष्टयाचा पदार्थ आहे. कुठे ही सहज मिळणारा पदार्थ.
७ जून २०१५ पासून या दिवसाला सुरूवात झाली. पोहे विविध पदार्थ वापरून बनवले जातात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25-30 मिनिटे
5 जणांसाठी
  1. 2.5 कपजाड पोहे
  2. 3 टेबलस्पूनशेंगदाणे
  3. 2कांदे
  4. 5-6हिरव्या मिरच्या
  5. 8-10कढीपत्त्याची पाने
  6. थोडी कोथिंबीर
  7. 3-4 टेबलस्पूनतेल
  8. चवीप्रमाणे मीठ
  9. 1 टीस्पूनसाखर
  10. 1 टीस्पूनजीरे
  11. 1 टीस्पूनमोहरी
  12. 1 टीस्पूनहळद
  13. 3 टेबलस्पूनकिसलेले सुके खोबरे
  14. 3-4 टेबलस्पूनबारीक पिवळी शेव
  15. लिंबू

कुकिंग सूचना

25-30 मिनिटे
  1. 1

    पोहे चाळणीत घेऊन चाळून,स्वच्छ करून पाण्याने भिजवून घेणे. कांदा, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर चिरून घ्यावेत.

  2. 2

    गॅसवर कढई तापत ठेवून त्यात तेल घालणे.तेल तापले की शेंगदाणे थोडे लालसर तळून घ्यावेत व पोहयांवरती काढून घेणे.

  3. 3

    नंतर त्यात जीरे-मोहरी, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या घालून परतणे. कांदा घालून थोडा लालसर होईपर्यंत भाजून घेणे. थोडा हिंग घालावा.हिंग आधी घालू नये,कारण जळू शकतो.

  4. 4

    कांदा चांगला भाजून झाल्यावर, हळद घालून परतवून घेणे.पोहे घालून चांगले मिक्स करून घेणे.नंतर चवीप्रमाणे मीठ घालून घेणे.

  5. 5

    1टीस्पून साखर घालून हलवून घ्यावे व झाकण ठेवून वाफ काढून घ्यावी.3-4 मिनिटांनी हलवून घेणे. 5-7 मिनिटे वाफवून घेणे. पोहे झाल्यावर गॅस बंद करावा. वरून कोथिंबीर घालावी.

  6. 6

    खायला देताना पोहे वरून खोबरे किस, कोथिंबीर, बारीक शेव घालावी व सोबत लिंबाची फोड द्यावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes