चिकन मसाला (chicken masala recipe in marathi)

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

#rr रेस्टॉरंट स्टाईल चिकन मसाला ही रेसिपी मी आज केली.
खूप छान झाली. सोबत गव्हाची रोटी त्यामुळे हाॅटेल मध्ये गेल्या सारखे वाटले.

चिकन मसाला (chicken masala recipe in marathi)

#rr रेस्टॉरंट स्टाईल चिकन मसाला ही रेसिपी मी आज केली.
खूप छान झाली. सोबत गव्हाची रोटी त्यामुळे हाॅटेल मध्ये गेल्या सारखे वाटले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40-50 मिनिटे
4-5 जणांसाठी
  1. 750 ग्रॅमचिकन
  2. 3कांदे
  3. 3टोमॅटो
  4. 1/4 कपतेल
  5. 2 टेबलस्पूनकांदा लसूण मसाला
  6. 1 टेबलस्पूनगरम मसाला
  7. 1 टीस्पूनधने पावडर
  8. 1 टीस्पूनलाल तिखट
  9. 1 टीस्पूनकाश्मिरी लाल तिखट
  10. 1 टीस्पूनऐव्हरेस्ट चिकन मसाला
  11. 1 टीस्पूनजीरे
  12. 1तमालपत्र
  13. 4-5काळीमिरी
  14. 4-5लवंगा
  15. 2हिरवे वेलदोडे
  16. 1 लहानतुकडा दालचिनी
  17. 3 टेबलस्पूनआलं-लसूण,कोथिंबीर पेस्ट
  18. 2-3 टेबलस्पूनदही
  19. 1 टीस्पूनहळद
  20. चवीप्रमाणे मीठ

कुकिंग सूचना

40-50 मिनिटे
  1. 1

    चिकन स्वच्छ धुवून घेणे व त्याला आलं, लसूण, कोथिंबीर यांची पेस्ट, दही,हळद व मीठ लावून चोळून घ्यावे. 1/2 तास किंवा 1-2 तास तरी मुरत ठेवावे.

  2. 2

    कांदे बारीक चिरून घ्यावेत. टोमॅटोच्या फोडी करून घेणे व मिक्सरमधुन त्याची पेस्ट करून घेणे.खडा मसाला काढून घेणे

  3. 3

    गॅसवर पातेले (लंगडी)तापत ठेवून त्यात तेल घालणे.तेल तापले की त्यात, जीरे, खडा मसाला घालून परतवून घेणे.नंतर कांदा घालून गुलाबीसर भाजून घेणे

  4. 4

    नंतर टोमॅटो प्युरी घालून परतवून घेणे. झाकण ठेवून 5 मिनिटे ठेवावे. नंतर मिश्रण जरा घट्ट झालेले असेल. त्यात सर्व मसाले घालून मिक्स करून घेणे.

  5. 5

    मीठ व चिकन घालून चांगले हलवून घेणे. मीठ कमी घालावे. कारण आधी चिकनला मीठ लावलेले आहे. थोडे थोडे पाणी घालून गॅस मध्यम आचेवर ठेवून, झाकण ठेवून चिकन शिजू द्यावे.

  6. 6

    अधूनमधून हलवून घेणे. चिकन शिजले व थोडे पाणी आटले की, गॅस बंद करावा. वरून कोथिंबीर टाकून सर्व्ह करावे. रेस्टॉरंट सारखा चिकन मसाला व गव्हाची रोटी एकदम झक्कास बेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes