ग्रीन चिकन मसाला (green chicken masala recipe in marathi)

Mrs. Snehal Rohidas Rawool
Mrs. Snehal Rohidas Rawool @cook_29139601
नायगाव - वसई

आज आपण चिकन ची वेगळी रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे ग्रीन चिकन मसाला
#rr

ग्रीन चिकन मसाला (green chicken masala recipe in marathi)

आज आपण चिकन ची वेगळी रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे ग्रीन चिकन मसाला
#rr

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
6 जण
  1. 1/2 किलो बॉयलर चिकन
  2. 2उभे चिरलेले कांदे
  3. कोथिंबीर
  4. 4 चमचेपुदिना चटणी
  5. चवीनुसारमीठ
  6. 5-6हिरव्या मिरच्या
  7. 2चक्री फुल
  8. 2हिरवी वेलची
  9. 2-3 तमालपत्र
  10. 1 चमचागरम मसाला
  11. 1 चमचाधने पावडर
  12. 1 चमचाकस्तुरी मेथी
  13. 3 चमचेतेल
  14. 3 चमचेदही
  15. 2 चमचेआलं लसूण पेस्ट

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    प्रथम चिकन धुवून त्यात मीठ, हळद,दही व अर्ध लिंबू पिळून 30 मिनिट मॅरीनेट करून घ्यावे.

  2. 2

    गॅस वर कढई ठेवून त्यात 2 चमचे तेल टाकून कांदा चॉकलेटी होई पर्यंत परतवून घ्यावा. मग मिक्सर भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या, कोथिंबीर व भाजून घेतलेला कांदा टाकून व पुदिना चटणी टाकून पेस्ट करून घ्यावी.

  3. 3

    त्याच कढई मध्ये 1 चमचा तेल वाढवून मध्यम आचेवर तमालपत्र, चक्री फुल व वेलची चांगली परतवून घ्यावी. मग त्यात आलं लसूण पेस्ट टाकून परतवून घ्यावी. मग त्यात वाटलेला हिरवा मसाला ऍड करावा.

  4. 4

    हिरवं वाटण तेला मध्ये फ्राय झालं की त्याला छान हिरवा कलर येतो. मग त्यात धना पावडर, गरम मसाला, सुक्या नारळाचा किस, कस्तुरी मेथी ऍड करावी व चांगली ढवळून घ्यावी. चवीनुसार मीठ ऍड करावे. 3 ते 4 मिनिट मिश्रण चांगले परतवून घ्यावं

  5. 5

    मग वरील मिश्रणात चिकन घालावे व चांगलं परतवून घ्यावे व स्लो गॅस वर 10 मिनिट चिकन शिजवून घ्यावे. चिकन शिजल्यावर छान पैकी चिकन ला तेल सुटलं. गरमा गरम तयार हिरवं चिकन. भाकरी, चपाती किंवा नान बरोबर हे एकदम छान लागत.

  6. 6
  7. 7
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Mrs. Snehal Rohidas Rawool
रोजी
नायगाव - वसई

Similar Recipes