मुग भजी (moong bhaji recipe in marathi)

Shilpa Ravindra Kulkarni
Shilpa Ravindra Kulkarni @Shilpa_2013
डोंबिवली

#KS8
आमच्या लहानपणी आम्ही राजेश खन्ना गार्डन मध्ये जायचो. गार्डनच्या बाहेर एक भजीची गाडी असायची तिथे मुग भजी मिळायचे . गरमागरम भजी छान असायचे.आज आपण तेच करूया.

मुग भजी (moong bhaji recipe in marathi)

#KS8
आमच्या लहानपणी आम्ही राजेश खन्ना गार्डन मध्ये जायचो. गार्डनच्या बाहेर एक भजीची गाडी असायची तिथे मुग भजी मिळायचे . गरमागरम भजी छान असायचे.आज आपण तेच करूया.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मिनिटे
२ जणांसाठी
  1. 1/2 कपमुगाची डाळ
  2. 1 इंचआलं
  3. 2हिरवी मिरची बारीक चिरून
  4. 5-6कढीपत्त्याची पाने
  5. 1/2 टीस्पूनहळद
  6. 1/2 टीस्पूनहिंग
  7. 1 टीस्पूनलाल तिखट
  8. 1/2 टीस्पूनजीरेे
  9. कोथिंबीर
  10. मीठ चवीनुसार
  11. तेल

कुकिंग सूचना

25 मिनिटे
  1. 1

    सर्व प्रथम मुगडाळ स्वच्छ धुऊन ५-६ तास भिजत घालावी.

  2. 2

    नंतर बेताचे पाणी घालून डाळ घट्ट वाटावी. त्यातच मिरची, आलं, हळद, लाल तिखट, जीरे हिंग, कढीपत्त्याची पाने वाटून घालावे.

  3. 3

    चवीप्रमाणे मीठ घालून,मिश्रण हाताने सारखे करावे. कोथिंबीर घालावी

  4. 4

    कढईत तेल तापवून हाताने छोटे छोटे भजी तेलात सोडावे.सोनेरी रंगावर तळून घ्यावेत.

  5. 5

    गरमागरम मुग भजी मिरची, लसूण चटणी किंवा सॉस बरोबर खायला द्यावे.

  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shilpa Ravindra Kulkarni
रोजी
डोंबिवली

Similar Recipes