बटाट्याच्या किसाची भजी (batadyachya kisachi bhaji recipe in marathi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

#Breakfast # खरे तर आज काही बटाट्याची भजे करण्याचे प्रयोजन नव्हते. कांद्याची खेकडा भजी होती. पण खाण्याचे वेळी ती कमी पडली. म्हणून वेळेवर, ही बटाट्याच्या किसाची गरमागरम भजी... मध्ये, एका मैत्रिणीने केली होती... म्हणून लगेच करायला घेतली..🥰 आणि मग गरमागरम भजी असल्यावर, सोबत वाफाळता चहा... मग काय विचारता..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 1मोठा बटाटा
  2. 1 कपचणाडाळ पीठ
  3. 1 टेबलस्पूनतांदळाचे पीठ
  4. 1हिरवी मिरची बारीक चिरून
  5. कोथिंबीर
  6. 1 टीस्पूनओवा
  7. 1 टीस्पूनतिखट किंवा चवीनुसार
  8. 1 टीस्पूनहळद
  9. 1/2 टीस्पूनजीरे पूड
  10. चवीनुसारमीठ
  11. 1 टेबलस्पूनकडकडीत तेल
  12. तळण्यासाठी तेल
  13. पाणी

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    बटाटा सोलून त्याचा कीस करून घ्यावा. एका भांड्यात चणाडाळ पीठ, त्यात तांदळाचे पीठ, बटाट्याचा कीस, मिरची, कोथिंबीर टाकावी.

  2. 2

    त्यातच, हळद, तिखट, मीठ आणि जीरे पूड टाकावी. कडकडीत तेल टाकून नंतर ते मिक्स करावे. त्यानंतर गरजेनुसार पाणी टाकून नेहमीच्या भज्यांच्या पिठापेक्षा घट्ट भिजवावे.

  3. 3

    कढईत तेल तापवून, गरम झाल्यावर आच मध्यम करावी. त्यात हातानेच मध्यम आकाराचे भजे टाकावीत. आणि चांगले सोनेरी रंगावर तळून घ्यावेत.

  4. 4

    अशा प्रकारे सर्व भजी छान तळून घ्यावीत. आता ही कुरकुरीत भजी, तळलेली हिरवी मिरची, चटणी सोबत गरमागरम सर्व्ह करावे. आणि सोबत वाफाळता चहा किंवा कॉफी असेल, तर क्या बात है..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
रोजी
Nagpur

टिप्पण्या (3)

Similar Recipes