मुंबई स्ट्रीट स्टाईल डबल मस्का पावभाजी (Pav Bhaji Recipe In Marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#KS8 #स्ट्रीट_फूड

# मुंबई स्ट्रीट स्टाईल डबल मस्का पावभाजी

संध्याकाळ झाली की मुंबईच्या रस्त्यांवरुन पावभाजीच्या गाड्यांवर मोठ्या तव्यावर मोठमोठ्या उलथण्यांचे खण खण लयबद्व आवाज करीत पावभाजीची भाजी हळूहळू आकार घेऊ लागते..भाज्या,मसाले,बटर यांचा स्वाद एकत्र होऊन लांबवर पावभाजीचा दरवळ पसरु लागतो..आणि त्या वासाने बेधुंद होत आपली पावले आपसूकच पावभाजीच्या गाडीकडे वळतात ..आणि मग आपल्या जठराग्नीला गरमागरम पावभाजीची आहुती पडायला सुरुवात होते..चला तर मग रेसिपीकडे..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25-30 मिनिटे
4 जणांना
  1. 3मोठे कांदे बारीक चिरुन
  2. 5-6बटाटे
  3. 3 टेबलस्पूनआलं लसूण पेस्ट
  4. 1/4 कपगाजराचे तुकडे
  5. 1/2प्लाॅवरचे तुकडे
  6. 1बारीक चिरलेली सिमला मिरची
  7. 3मोठे बारीक चिरलले टोमॅटो
  8. 5-6 टेबलस्पूनपावभाजी मसाला
  9. 1 कपबटर
  10. 2 टेबलस्पूनलाल तिखट
  11. 1 टीस्पूनहळद
  12. मीठ चवीनुसार
  13. भरपूर कोथिंबीर
  14. तेल
  15. पाणी गरजेनुसार
  16. 1बीटाचे तुकडे
  17. 1 कपमटार
  18. 1 टेबलस्पूनकाश्मिरी लाल तिखट
  19. 1/4 कपफरसबी चे तुकडे

कुकिंग सूचना

25-30 मिनिटे
  1. 1

    प्रथम साहित्य जमा करून घ्या.कुकरमध्ये भाज्या वाफवून घ्या. बाकीचे साहित्य बारीक चिरून घ्या‌.आलं लसूण पेस्ट करून घ्या.

  2. 2

    एक कढई गरम करून त्यात तेल आणि बटर एकत्र करुन कांदा परतून घ्या.. नंतर आलं लसूण पेस्ट घालून परतून घ्या, आता टोमॅटो घालून एकत्र करून परतून घ्या. स्मॅशरने एकजीव करावे.नंतर त्यात पावभाजी मसाला,लाल तिखट,हळद घालून मिक्स करा‌.माझ्याकडे मोठा तवा नाही म्हणून मी कढईत केली.

  3. 3

    नंतर त्यात सिमला मिरची घालून परतून घ्या.उकडलेल्या भाज्या,बीट घालून एकत्र करा‌. उकडलेले बटाटे, गरजेनुसार पाणी घालून भाजी नीट स्मॅश करुन घ्या.भाजीमध्ये मीठ घालून मिक्स करा.. भाजी 5 मिनीटे शिजू द्या. एका कढल्यात तेल,बटर मिक्स करुन त्यात आलंलसूण पेस्ट,थोडा कांदा,टोमॅटो घालून परता..थोडा पावभाजी मसाला,काश्मिरी लालतिखट चवीनुसार मीठ घालून अर्धा मिनीट परतून घ्या..आणि भाजीवर ओतून छान मिक्स करा. वरुन परत थोडं बटर घाला..तयार झाली आपली चमचमीत गरमागरम मुंबई स्ट्रीट स्टाईल पावभाजी तयार..😋😋

  4. 4
  5. 5

    तव्यावर बटर गरम करून त्यात पावभाजी मसाला, कोथिंबीर घालून मिक्स करा.पाव त्यात भाजून घ्या. गरमगरम पावभाजी कादा,लिंबू भरपूर कोथिंबीर घालून सर्व्ह करा‌.

  6. 6
  7. 7
  8. 8
  9. 9
  10. 10
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

टिप्पण्या (5)

Similar Recipes