स्ट्रीट स्टाइल पावभाजी (pav bhaji recipe in marathi)

Anjali Muley Panse
Anjali Muley Panse @Anjaliskitchen_212
Pune

#KS8
स्ट्रीट फुड म्हणल की माझ्या डोळ्यासमोर फक्त पावभाजीच येते इतकी मला पावभाजी आवडते. आहेच हा पदार्थ तसा नाही का त्यात परत महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईत जन्मलेला हा पदार्थ चाकरमान्यांचा पोटभरीचा आणि टीनएजर्स चा आवडताही आहे. पावसाळी गार हवेत तर ह्या पावभाजीला काही तोडच नाही😀😋

स्ट्रीट स्टाइल पावभाजी (pav bhaji recipe in marathi)

#KS8
स्ट्रीट फुड म्हणल की माझ्या डोळ्यासमोर फक्त पावभाजीच येते इतकी मला पावभाजी आवडते. आहेच हा पदार्थ तसा नाही का त्यात परत महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईत जन्मलेला हा पदार्थ चाकरमान्यांचा पोटभरीचा आणि टीनएजर्स चा आवडताही आहे. पावसाळी गार हवेत तर ह्या पावभाजीला काही तोडच नाही😀😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 3मध्यम बटाटे
  2. 1हिरवी शिमला मिरची बारीक चिरून
  3. 1मध्यम गाजर चिरून
  4. 1/4 कपमटार (मी फ्रोझन वापरले)
  5. 1/2 कपफ्लावर चिरलेला
  6. 1/2 कपटोमॅटो प्युरी
  7. 3 टेबलस्पूनलसणाची पेस्ट
  8. 2मध्यम कांदे बारीक चिरून
  9. 1हिरवी शिमला मिरची बारीक चिरून
  10. 1टोमॅटो बारिक चिरून
  11. 2 टेबलस्पूनलाल मिरचीची पेस्ट
  12. 2 टेबलस्पूनतेल
  13. 1/4 कपअमूल बटर
  14. मीठ चवीनुसार
  15. 1 टेबलस्पूनपावभाजी मसाला
  16. सजावटीसाठी चिरलेला कांदा,कोथिंबीर,काकडी

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    बटाटे,शिमला मिरची,गाजर,फ्लॉवर,मटार ह्या चिरलेल्या भाज्या कुकरमधे 3 शिट्टीत शिजवून घ्याव्यात. टोमॅटोची प्युरी करून घ्यावी. लसणाची पेस्ट करून घ्यावी. लाल मिरच्या गरम पाण्यात भिजवून मिक्सरमधून पेस्ट करून घ्यावी.

  2. 2

    आता कढईत तेल व बटर घालून त्यात कांदा;शिमला मिरची ;टोमॅटो व लसुण पेस्ट घालून परतून घ्यावे.

  3. 3

    परतलेल्या भाज्यांवर लाल मिरचीची पेस्ट :मीठ व पावभाजी मसाला घालून तेल सुटेपर्यंत परतून घेऊन टोमॅटोची प्युरी घालावी. तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे.

  4. 4

    आता तयार मसाल्यात शिजलेल्या भाज्या घालून स्मॅशरने भाज्या स्मॅश करून घ्याव्यात. 1 टेबलस्पून बटर घालून हलवून घ्यावे.

  5. 5

    वरून फ्रोझन मटार घालून पावभाजीत गरजेनुसार पाणि घालुन एक ऊकळी आणावी. 2 टेबलस्पून बटर घालून 2 मिनिट मंद गॅसवर भाजी ऊकळू द्यावी.आपली गरमागरम पावभाजी तयार आहे.

  6. 6

    गरमागरम पावभाजी तव्यावर भरपूर बटर लावून भाजलेले पाव, काकडीच्या चकत्या,बारिक चिरलेला कांदा,कोथिंबीर व लींबाची फोड आणि वरून बटर घालून सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anjali Muley Panse
Anjali Muley Panse @Anjaliskitchen_212
रोजी
Pune
I am not a Master chef,but passionate about food - the tradition of it,cooking it and sharing it😊
पुढे वाचा

Similar Recipes