पावभाजी (pav bhaji recipe in marathi)

Prachi Phadke Puranik
Prachi Phadke Puranik @cook_24245173_PP

#स्नॅक्स खूप भाज्या आपल्यामधे सामावून घेणारा पावभाजी हा पदार्थ. हाॅटेलमधे पाऊल ठेवताच ह्या पदार्थाचा सुवास आला नाही असं होतच नाही. नुसतं हाॅटेलच्या जवळ जरी गेलं तरी ह्या सुवासाने माणसाची भुक चाळवते आणि पाय आपोआप वळतात पावभाजी खायला. सध्या कोरोनामुळे जरा बाहेरचं जेवण टाळलं जातय तर म्हंटलं कुकरमधे करुन बघुया आज पावभाजी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२ तास
४ सर्व्हिंगज
  1. 1/4 किलोमटार
  2. 4मोठे बटाटे
  3. 2मध्यम टोमॅटो
  4. 4मध्यम कांदे
  5. 4छोट्या सिमला मिरच्या
  6. 1 छोटाफ्लाॅवर
  7. 1 टेबलस्पूनआलं लसूण पेस्ट
  8. 3 टीस्पूनलाल तिखट
  9. 2 टेबलस्पूनपावभाजी मसाला
  10. 2 टीस्पूनकाश्मिरी लाल तिखट
  11. 1 टीस्पूनहळद
  12. आवश्यकतेनुसार पाणी
  13. चवीनुसारमीठ
  14. 1 टेबलस्पूनअमूल बटर

कुकिंग सूचना

२ तास
  1. 1

    प्रथम सर्व भाज्या धुवुन चिरुन घ्याव्यात. मग कुकरमधे अमूल बटर घेऊन ते गरम झाल्यावर त्यात चिरलेला कांदा घालावा. मग आलं लसूण पेस्ट घालून परतावं. त्यानंतर अनुक्रमे टोमॅटो, सिमला मिरच्या, मटार, फ्लाॅवर घालून सर्व भाज्या व्यवस्थित परतून घ्याव्या.

  2. 2

    आता भाज्यांच्या मिश्रणात लाल तिखट, हळद, पावभाजी मसाला आणि घालून भाज्यांना ते चांगले लावून घ्यावेत आणि मग पाणी घालावे. प‍ाणी घालून व्यवस्थित ढवळल्यावर कुकरचे झाकण लावून ३ ते ४ शिट्टया होऊ द्याव्या.

  3. 3

    कुकर उघडल्यानंतर सर्व भाज्या स्मॅशरने स्मॅश करुन घ्याव्या आणि काश्मिरी लाल तिखट आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून सारखं करुन घ्यावं आणि एक उकळी आणावी. हि झाली भाजी तयार.

  4. 4

    एका तव्यावर पावाला बटर लावून दोन्ही बाजूने पाव खरपूस भाजून घ्यावे. आणि भाजीबरोबर सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Prachi Phadke Puranik
Prachi Phadke Puranik @cook_24245173_PP
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes