पनीर टिक्का (paneer tikka recipe in marathi)

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

#कूकस्नॅप week - 1
#पनीर टिक्का ही प्रिती साळवी यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल केला आहे.
मी टोमॅटो व कसुरी मेथी वापरली आहे.
खूप छान झाली होती.

पनीर टिक्का (paneer tikka recipe in marathi)

#कूकस्नॅप week - 1
#पनीर टिक्का ही प्रिती साळवी यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल केला आहे.
मी टोमॅटो व कसुरी मेथी वापरली आहे.
खूप छान झाली होती.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10-15 मिनिटे
2-3 जणांसाठी
  1. 7-8पनीर क्यूब्ज
  2. 7-8कांदयाचे चौकोनी तुकडे
  3. 7-8सिमला मिरचीचे चौकोनी तुकडे
  4. 5-6टोमॅटोचे चौकोनी तुकडे
  5. 1.5 टेबलस्पूनबेसन पीठ
  6. 1/4 कपदही
  7. 1/2 टीस्पूनलाल तिखट
  8. 1/4 टीस्पूनहळद
  9. चिमूटभरहिंग
  10. 1/2 टीस्पूनकसुरी मेथी
  11. 1/4 टीस्पूनमीठ
  12. 1/2 टेबलस्पूनतेल
  13. 1/2 टेबलस्पूनबटर
  14. 4-5वुडन स्टीक

कुकिंग सूचना

10-15 मिनिटे
  1. 1

    सर्व साहित्य घ्यावे. कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, पनीर यांचे तुकडे करून घेणे.बेसन पीठ मंद आचेवर भाजून घ्यावे.

  2. 2

    एका वाटी मध्ये दही थोडे फेटून घेणे. त्यात सर्व मसाले,बेसन पीठ, मीठ घालून मिक्स करून घेणे.त्यात चिरलेले सर्व पदार्थ घालून मॅरिनेड करून घेणे.5-7 मिनिटे ठेवावे.

  3. 3

    एक वुडन स्टीक घेऊन त्याला मॅरिनेट केलेले सिमला मिरची, कांदा, टोमॅटो, पनीर व परत याच क्रमाने लावून घेणे. असेच बाकीच्या स्टीक करुन घेणे.

  4. 4

    गॅसवर तवा किंवा पॅन गरम करत ठेवावा. त्यात तेल व बटर घालावे. त्यात स्टीक ठेवून सर्व बाजूंनी शॅलो फ्राय करून घेणे.

  5. 5

    टोमॅटो साॅस सोबत किंवा नुसते खाण्यासाठी ही छान लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
रोजी

टिप्पण्या (4)

Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
Main फोटो टाकायचा राहिला आहे का ताई?

Similar Recipes