इन्स्टंट रवा-पोहे डोसा,चटणी (instant rava poha dosa chutney recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

#bfr
रवा आणि पोह्यांचा वापर करून मस्त ,मुलांच्या आवडीचे इन्स्टंट डोसे आणि चटणी ब्रेकफास्ट साठी बनवले.खूप मस्त झाले.

इन्स्टंट रवा-पोहे डोसा,चटणी (instant rava poha dosa chutney recipe in marathi)

#bfr
रवा आणि पोह्यांचा वापर करून मस्त ,मुलांच्या आवडीचे इन्स्टंट डोसे आणि चटणी ब्रेकफास्ट साठी बनवले.खूप मस्त झाले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

५-७ मिनिटे
३-४
  1. 2 कपपोहे
  2. 1 कपरवा
  3. 2 टेबलस्पूनबेसन/ तांदळाचे पीठ
  4. 1/2 कपदही
  5. 2 टेबलस्पूनआलं, लसूण मिरची पेस्ट
  6. 1/2 टीस्पूनमीठ
  7. 2 कपपाणी...आवश्यकतेनुसार जास्त
  8. 2 टेबलस्पूनतेल
  9. चटणी...
  10. 1/2 कपखोबरे
  11. 1/2 कपकोथिंबीर
  12. 1/4 कपपुदिना पाने
  13. 1/2कांदा
  14. 3हिरव्या मिरच्या
  15. 1/2 इंचआलं
  16. 1 इंचचिंचेचा तुकडा
  17. 1 टीस्पूनसाखर
  18. 1/4 टीस्पूनमीठ
  19. 1/4 कपपाणी...आवश्यकतेनुसार कमी जास्त

कुकिंग सूचना

५-७ मिनिटे
  1. 1

    पोहे आणि रवा मिक्सर मधून बारीक करून घेतले.

  2. 2

    त्यात दही, आलं लसूण मिरची पेस्ट,मीठ,बेसन घालून नीट मिक्स केले.पाणी घालून बॅटर तयार केले.पंधरा - वीस मिनिटे झाकून ठेवले म्हणजे रवा छान फुलतो.नंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून पुन्हा छान मिक्स करून घेतले.

  3. 3

    तवा गरम करून त्यावर ब्रश क्या साहाय्याने तेल लावून,तयार बॅटरचे पळीच्या साहाय्याने डोसे घातले.दोन तीन मिनिटांनी उलटून दुसरी बाजू पण भाजून घेतली.

  4. 4

    चटणीसाठीचे सर्व साहित्य मिक्सर मध्ये घालून फिरवले.आवश्यकतेनुसार पाणी घालून बारीक वाटून चटणी तयार केली.

  5. 5

    गरम गरम डोसे चटणी सोबत सर्व्ह केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

Similar Recipes