कढीपत्त्याची चटणी (kadipattyachi chutney recipe in marathi)

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

कढीपत्त्याची पाने म्हणजे भरपूर कॅल्शियम.फोडणीला कढीपत्ता हवाच.पण आपण तो काढून टाकतो खात नाही.
त्यामुळे चटणी केली तर सर्वांच्या पोटात जाऊ शकतो.
मी स्मिता पाटील यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे .खूप छान झाली चटणी.
त्यात जीरे, तीळ, जवस,खोबरे, शेंगदाणे हे पौष्टिकपदार्थ ही आहेच.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10-15 मिनिटे
5-6 जणांसाठी
  1. 1 कपकढीपत्त्याची पाने
  2. 1/4 कपशेंगदाणे
  3. 1 टेबलस्पूनतीळ
  4. 3/4 टेबलस्पूनजीरे
  5. 1 टेबलस्पूनजवस
  6. 1 टेबलस्पूनखोबरे किस
  7. 7-8लसूण पाकळ्या
  8. 3/4 टीस्पूनलाल तिखट. आवडीनुसार कमी-जास्त करू शकता
  9. 1/2 टीस्पूनमीठ

कुकिंग सूचना

10-15 मिनिटे
  1. 1

    कढीपत्त्याची पाने स्वच्छ धुऊन निथळत ठेवणे. गॅसवर कढई तापत ठेवून त्यात थोडेसे तेल घालून घेणे. त्यावर कढीपत्ता भाजून घेणे.

  2. 2

    त्याच कढईत शेंगदाणे, जवस, तीळ, खोबर्‍याचा किस थोडेसे भाजून घेणे. सर्व थंड करत ठेवावे.

  3. 3

    मिक्सरच्या भांड्यात सर्व साहित्य घालून घेणे. तिखट,मीठ घालून घेणे. बारीक चटणी वाटून घेणे.लसूण मी आधी घालायचा विसरले म्हणून नंतर घातला.

  4. 4

    तयार चटणी काचेच्या बरणीत भरून ठेवणे. ही चटणी बरेच दिवस टिकते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes