कच्च्या टोमॅटोची चटणी (kachya tomato chutney recipe in marathi)

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

#सात्विक रेसिपी कूकस्नॅप
सुषमा कुलकर्णी यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.खोबरे थोडे कमी घातले.
छान झाली चटणी.

कच्च्या टोमॅटोची चटणी (kachya tomato chutney recipe in marathi)

#सात्विक रेसिपी कूकस्नॅप
सुषमा कुलकर्णी यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.खोबरे थोडे कमी घातले.
छान झाली चटणी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20-25 मिनिटे
4-5 जणांसाठी
  1. 1कच्चा टोमॅटो
  2. 3-4हिरव्या मिरच्या
  3. 1/4 इंचआलं
  4. 2 टेबलस्पूनशेंगदाणे
  5. 2 टेबलस्पूनतीळ
  6. 3 टेबलस्पूनओले खोवलेले खोबरे
  7. 2 टेबलस्पूनकोथिंबीर
  8. 1/2 टीस्पूनसाखर
  9. चवीप्रमाणे मीठ
  10. फोडणीचे साहित्य
  11. 1 टेबलस्पूनतेल
  12. 1/2 टीस्पूनजीरे-मोहरी
  13. 6-7कढीपत्त्याची पाने
  14. 1/8 टीस्पूनहिंग

कुकिंग सूचना

20-25 मिनिटे
  1. 1

    टोमॅटो, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, आलं बारीक चिरून घ्यावेत. खोबरे खोवून घेणे.

  2. 2

    गॅसवर कढई तापत ठेवून त्यात शेंगदाणे व तीळ घालून थोडेसे परतवून घेणे. नंतर थोडेसे तेल टाकून परतावे. नंतर मिरचीचे व आल्याचे तुकडे घालून परतून घ्यावे.

  3. 3

    टोमॅटोचे तुकडे व ओले खोवलेले खोबरे घालून परतणे. नंतर मीठ व साखर घालून मिक्स करावे व टोमॅटो थोडे मऊ होईपर्यंत परतवून घेणे.

  4. 4

    टोमॅटो थोडे मऊ झाले की गॅस बंद करावा. वरून कोथिंबीर टाकून मिक्स करावे व थंड करत ठेवावे.

  5. 5

    मिश्रण थंड झाले की मिक्सरमधुन बारीक वाटून घ्यावे. एका वाटी मध्ये मिश्रण काढून घ्यावे.

  6. 6

    फोडणीच्या कढईत तेल गरम करत ठेवावे. तेल तापले की त्यात जीरे-मोहरी, हिंग घालावे. कढीपत्त्याची पाने घालून परतणे.गॅस बंद करावा. तयार फोडणी चटणी वर घालून घेणे व मिक्स करणे.खाण्यासाठी तयार कच्च्या टोमॅटोची चटणी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes