बटाटे वडा व चटणी (batavada chutney recipe in marathi)

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

#बटाटेवडा. सर्वांना आवडणारा पदार्थ वडापाव. सातारा मध्ये सुपनेकर यांची बटाटेवडा व चटणी हा पदार्थ खूप प्रसिद्ध आहे.मी आज हाच बेत केला आहे.

बटाटे वडा व चटणी (batavada chutney recipe in marathi)

#बटाटेवडा. सर्वांना आवडणारा पदार्थ वडापाव. सातारा मध्ये सुपनेकर यांची बटाटेवडा व चटणी हा पदार्थ खूप प्रसिद्ध आहे.मी आज हाच बेत केला आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40-50 मिनिटे
12-13 वडे
  1. 3उकडलेले बटाटे
  2. 1मोठा कांदा चिरलेला
  3. 3-4हिरव्या मिरच्या. कमी-जास्त करू शकता
  4. 1/2 इंचआलं
  5. 8-10लसूण पाकळ्या
  6. 1 टीस्पूनमीठ
  7. 1 टीस्पूनजीरे-मोहरी
  8. 1/4 टीस्पूनहळद
  9. 1-1/2 टेबलस्पून तेल
  10. थोडी कोथिंबीर
  11. वरच्या पारीसाठी साहित्य
  12. 1 कपबेसन पीठ
  13. 2 टेबलस्पूनतांदळाचे पीठ
  14. 1/2 टीस्पूनमीठ
  15. 1/2 टीस्पूनहळद
  16. 1 टीस्पूनलाल तिखट
  17. 1/2 टीस्पूनधने पावडर
  18. 1/2 टीस्पूनजीरे पावडर
  19. 1/4 टीस्पूनखाण्याचा सोडा
  20. चटणीसाठी साहित्य
  21. 1/2 कपभाजलेले शेंगदाणे
  22. 2-3हिरव्या मिरच्या. आवडीनुसार कमी-जास्त करू शकता
  23. थोडी कोथिंबीर
  24. 1/2 टीस्पूनजीरे
  25. 1 टीस्पूनसाखर
  26. 1 टीस्पूनमीठ
  27. 1 टेबलस्पूनदही
  28. थोडे पाणी
  29. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

40-50 मिनिटे
  1. 1

    उकडलेले बटाटे साले काढून कुस्करुन घेणे. कांदा बारीक चिरून घ्यावा. आवडत असल्यास घालावा.

  2. 2

    हिरव्या मिरच्या कोथिंबीर,लसूण,आलं हे सर्व मिक्सरमधुन बारीक करून घेणे.

  3. 3

    गॅसवर कढई तापत ठेवून त्यात तेल घालणे. तेल तापले की त्यात जीरे-मोहरी,हिंग घालून घेणे. नंतर कांदा घालून गुलाबी रंगावर भाजून घेणे. कांदा भाजल्या वर हिरव्या मिरचीचे वाटण घालून चांगले परतवून घेणे.

  4. 4

    मीठ,हळद घालून परतवून घेणे. कुस्करलेला बटाटा घालून चांगले मिक्स करून घेणे व झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यावी.गॅस बंद करावा. भाजी डिशमध्ये काढून थंड करत ठेवावी.

  5. 5

    एका पसरट बाऊलमध्ये बेसन पीठ,तांदळाचे पीठ, मीठ, हळद, लाल तिखट,धने-जीरे पावडर एकत्र मिक्स करून घेणे व थोडे थोडे पाणी घालून जास्त पातळ किंवा घट्ट पीठ न करता मध्यम पातळ भिजवून घेणे.

  6. 6

    थंड झालेल्या भाजीचे लहान गोळे करून थोडे चपटे करावे. गॅसवर कढई तापत ठेवून,त्यात तेल तापत ठेवावे. वडे करायला घेताना खायचा सोडा घालून मिक्स करून घेणे.

  7. 7

    गॅस मध्यम आचेवर ठेवून एकेक गोळा घेऊन पिठात बुडवून तेलात सोडावे. 3-4 वडे घालून दोन्ही बाजूंनी छान तळून घ्यावे.सर्व वडे तळून घ्यावेत.

  8. 8

    मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे, जीरे,हिरव्या मिरच्या, कोथिंबीर,मीठ,साखर,दही व थोडे पाणी घालून बारीक वाटून घ्यावे. चटणी तयार.

  9. 9

    वडे चटणी बरोबर खावे किंवा चटणीत डीप करून ही खाऊ शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes