तीळ चटणी (til chutney recipe in marathi)

#EB5 #W5
थंडी आणि तीळ यांचे अतूट नाते आहे.अगदी थंडीमध्ये शरिराला उर्जा चटकन मिळवून देणारा पदार्थ म्हणजे तीळ!मूर्ती लहान आणि कार्य महान असे हे तीळ.तीळाचे ,पांढरे पॉलीश केलेले तीळ,गावरान तीळ हे प्रकार आहेत.पॉलिश तीळापेक्षा गावरान तीळ वापरण्याकडेच कल दिसून येतो.संक्रांतीला तीळगूळ,गुळाच्या पोळीला,लेकुरवाळ्या भाजीला,बाजरीच्या भाकरीला तीळाचा मुबलक वापर केला जातो.तीळाची चटणी हे एक खमंग तोंडीलावणे!
आजच्या या तीळाच्या चटणीमध्ये जवस,शेंगदाणे, खोबरे याचाही वापर केल्याने चटणी खूपच मस्त आणि पौष्टिक झाली आहे....बघा बरं चव घेऊन ...आवडतेय का?
तीळ चटणी (til chutney recipe in marathi)
#EB5 #W5
थंडी आणि तीळ यांचे अतूट नाते आहे.अगदी थंडीमध्ये शरिराला उर्जा चटकन मिळवून देणारा पदार्थ म्हणजे तीळ!मूर्ती लहान आणि कार्य महान असे हे तीळ.तीळाचे ,पांढरे पॉलीश केलेले तीळ,गावरान तीळ हे प्रकार आहेत.पॉलिश तीळापेक्षा गावरान तीळ वापरण्याकडेच कल दिसून येतो.संक्रांतीला तीळगूळ,गुळाच्या पोळीला,लेकुरवाळ्या भाजीला,बाजरीच्या भाकरीला तीळाचा मुबलक वापर केला जातो.तीळाची चटणी हे एक खमंग तोंडीलावणे!
आजच्या या तीळाच्या चटणीमध्ये जवस,शेंगदाणे, खोबरे याचाही वापर केल्याने चटणी खूपच मस्त आणि पौष्टिक झाली आहे....बघा बरं चव घेऊन ...आवडतेय का?
कुकिंग सूचना
- 1
तीळ व जवस खरपूस भाजून घ्यावेत.शेंगदाणे भाजावेत. खोबऱ्याचे काप करुन थोड्या तेलावर भाजावेत. कढीपत्ता धुवून कोरडा करुन मायक्रोवेव्ह मध्ये 2मिनिटे ठेवावा.कुरकुरीत होतो.कढीपत्ता तळून घ्यावा.ब्याडगी मिरची किंचीत तेल घालून गरम करून घ्यावी.
- 2
सर्व भाजलेले साहित्य थंड झाले की त्यात भाजलेल्या मिरच्या, तिखट,जीरे,मीठ,साखर,तळलेला कुरकुरीत कढीपत्ता व लसूणपाकळ्या घालून.
- 3
चटणी मिक्सरवर बारीक एकजीव करुन घ्यावी. खमंग स्निग्ध अशी चटणी तयार आहे.पोळी,भाकरी या बरोबर सर्व्ह करावी.😋😋👍
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
तीळ खोबरे चटणी (til khobra chutney recipe in marathi)
#EB5 #W5. हिवाळा आणि तिळाचे घट्ट नाते आहे. हिवाळ्यामध्ये शरीराला स्नीग्धतेची गरज असते. अशावेळी तिळाचे सेवन , योग्य.. कोणत्याही रुपात.. म्हणून आज ही तीळ आणि खोबऱ्याची चटणी.. Varsha Ingole Bele -
तीळाची कोरडी चटणी (tilachi kordi chutney recipe in marathi)
#CNतीळा तीळा दार उघड...तीळगूळ घ्या गोड बोला...एक तीळ सात जणांनी वाटून खावा...तीळमात्र शंका नाही...जीव तीळतीळ तुटतो...तोंडात तीळ भिजत नाही...तीळाचं तेल कापसाची वात...😃बघा..मराठी भाषा किती समृद्ध आहे!...🤗आणि तीळाचे आहारातीलही किती महत्त्व आहे.एवढासा तीळ तो,पण कार्य किती मोठं...आपल्या शरिराला उर्जा देणारे,भरपूर स्निग्धांश असलेले हे तीळ अगदी सगळ्याच पदार्थात उठून दिसतात.थालिपीठ,चकली,मुटके,भोपळघारगे,अळुवडी,कोथिंबीर वडी,धिरडी यांच्यावर मुक्तहस्ते उधळण किती सुंदर दिसते!👌संक्रांतीच्या भोगीची भाकरी तीळ लावल्याशिवाय होतच नाही.दाण्याचा कूट आणि तीळाचा कूट वांग्यांच्या भाजीत हवाच!तीळाचा काटेरी हलवा अगदी स्नेहपूर्ण असतो.भाजलेले तीळ आणि लोणी वजन वाढवायला उपयुक्त असतात. तीळ लावलेले खमंग भाजलेले नान आणि पावही छान लागतात.घराघरात हमखास केली जाणारी आणि पटकन होणारी तीळाची चटणीही डावीकडे हवीच!प्रवासातही उपयोगी शिवाय करायला सोपी... Sushama Y. Kulkarni -
जवस तीळ चटणी (jawas til chutney recipe in marathi)
#जवस व तीळ हे सुपर फूड जगमान्य आहे.मला हेल्दी रेसिपीज जास्त आवडतात. मी आज बनवली म्हटले चला मैत्रिणी सोबत शेअर करू या.ब्लड शुगर, कॉलेस्ट्रॉल, बीपी,हार्ट प्रॉब्लेम ,लोह हिमोग्लबीन पासून सुटका हे सुपर फूड च नाही का. Rohini Deshkar -
जवसाची चटणी (javasachi chutney recipe in marathi)
#cnजेवणाच्या पानात उजवी आणि डावी बाजू अगदी बँलन्स हवी.हा बँलन्स जशा भाज्या,आमटी,पातळ भाज्या साधतात तशाच चटण्या,कोशिंबिरीही!!हल्ली आहारात जवसाचा समावेश वाढला आहे.याचं मुख्य कारण म्हणजे जवस वाईट कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते.शरिरातील कफाचे प्रमाण कमी करते.मधुमेह, रक्तदाब नियंत्रित ठेवते.ओमेगा 3चे भरपूर स्त्रोत असलेले फायबरयुक्त जवस हे शाकाहारी लोकांसाठी वरदानच आहे! Sushama Y. Kulkarni -
पंचमेळ चटणी (panchamel chutney recipe in marathi)
#GA4 #week4 आज मी कारळ, जवस, मीरे, सुके खोबरे व तीळ या पाच वस्तू एकत्र करून चटणी बनवली आहे. Ashwinee Vaidya -
कढीपत्त्याची चटणी (kadipattyachi chutney recipe in marathi)
कढीपत्त्याची पाने म्हणजे भरपूर कॅल्शियम.फोडणीला कढीपत्ता हवाच.पण आपण तो काढून टाकतो खात नाही.त्यामुळे चटणी केली तर सर्वांच्या पोटात जाऊ शकतो.मी स्मिता पाटील यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे .खूप छान झाली चटणी.त्यात जीरे, तीळ, जवस,खोबरे, शेंगदाणे हे पौष्टिकपदार्थ ही आहेच. Sujata Gengaje -
जवसाची चटणी (javasachi chutney recipe in marathi)
#EB8 #W8जवस, तीळ, दाणे,कढीपत्ता सगळे खमंग भाजून केलेली ही चटणी खुप टेस्टी व पौष्टिक होते Charusheela Prabhu -
जवस चटणी (jawas chutney recipe in marathi)
#GA4 #week4 theme#chutney आरोग्य आणि सौंदर्यासाठी लागणार्या वस्तू आपल्या च घरात असतात परंतु बरेचदा आपल्या ला त्याची कल्पना नसते.जवस आणि तीळ हे त्यातलेच पदार्थ!ओमेगा3, फायबर, व्हिटॅमिन बी,कफ कमी करणारे, वजन कमी करण्यासाठी उपयुक्त!तीळ कॅल्शियम असलेले,दात मजबूत करणारे!अशा गुणी पदार्थांची चटणी आपण करू या. Pragati Hakim -
तीळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5#W5#विंटर_स्पेशल_रेसिपीज_ebook_challenge..#तीळाची_चटणी पांढरे तीळ,काळे तीळ आणि थंडी यांचंदृढ समीकरण सर्वांनाच माहीत आहे.. थंडीमधल्याआहारात तीळाचा मुबलक प्रमाणात वापर करुन तीळ तीळ करत शरीरात उष्णता साठवून थंडीपासून बचाव केला जातो..तीळाच्या चटणीमधून शरीराला आवश्यक ती उष्णता मिळतेच त्याचबरोबर स्निग्धताही मिळते..एक पे एक फ्री...😀 असे बहुगुणी आहेत आपले खाद्यपदार्थ..So त्यांचा वापर स्वयंपाकात वरचेवर व्हायलाच हवा.. Bhagyashree Lele -
अळशीची (जवसाची चटणी) (jawsachi chutney recipe in marathi)
#GA4#week4#keyword_chutneyअळशी म्हणजे जवस ही चटणी पौष्टिक आहे.वजन नियंत्रणात आणण्यासाठी मदत होते.ओमेगा ३ .तर अशी ही जवसाची चटणी करून बघूया. Shilpa Ravindra Kulkarni -
जवसाची चटणी (javasachi chutney recipe in marathi)
अतिशय पोष्टीक .आरोग्यासाठी उत्तम .मी जवस रोज खाते पण तुमच्या मुळे हा चटणी बनवायचा योग आला .आणि खरच खूप सुंदर चटणी झाली आहे#EB8 #W8. Adv Kirti Sonavane -
जवस तीळ चटणी (Javas til chutney recipe in marathi)
तोंडी लावायला मस्त अशी ही चटणी.:-) Anjita Mahajan -
लज्जतदार तीळ खोबरे चटणी (til khobra chutney recipe in marathi)
#EB5#W5विंटर स्पेशल रेसिपी e -book challengeतिळाचा आहारात मुबलक प्रमाणात वापर होतो . थंडीच्या दिवसात तिळाची गुळपापडी, चटणी, लाडू, सूप असे अनेक प्रकार बनवतात. त्याचे सेवन केल्यामुळे शरीरात उष्णता साठवून थंडी पासून बचाव केला जातो. भरपूर प्रमाणात स्निग्धता मिळते असा हा बहुगुणी तीळ आहे मी येथे खोबरे व तीळ यांची चटणी बनवली आहे. चला तर पाहुयात काय सामग्री लागते ते .... Mangal Shah -
तीळ शेंगदाणा चटणी (til shengdana chutney recipe in marathi)
#CN#तीळ शेंगदाणा चटणीभरपूर प्रमाणात कॅल्शियम, प्रोटीन असलेली ही पौष्टिक चटणी... रोजच्या जेवणात घेतल्यास... शरीर वाढीसाठी याचा नक्कीच फायदा होतो त्यासाठी ही रेसिपी..... Shweta Khode Thengadi -
बहुगुणी जवसाची चटणी (javasachi chutney recipe in marathi)
#CN ताटात चटणी म्हटली की डाव्या बाजूला नजर जाते . जवसाची चटणी फार कमी प्रमाणात केली जाते.खर तर जवस हा आपल्या शरीरस्वास्थ्यासाठी अत्यंत हेल्दी आहे. खेडेगावात मात्र हि चटणी आवर्जून करतात. जवसा मध्ये विटामिन्स, मिनरल्स भरपूर प्रमाणात मिळतात .पचनासाठी, हार्मोनल बॅलन्स व सांधेदुखीसाठी तर रामबाण उपाय आहे . जवसाचा सेवन केल्याने हाडांचे आरोग्य चांगले राहते. रोज अर्धा चमचा तरी जवस खाल्ल्याने बरेच आजार कमी होतात. अश्या ह्या बहुगुणी जवसाची चटणी तयार केली चला पाहुयात कशी करायची ते ... Mangal Shah -
जवस चटणी (javas chutney recipe in marathi)
#cn जवस हे खुप औषधी गुणांवर उपयुक्त ठरते. कोलेस्टाल वर खुप चांगले आहे , त्या मुळे त्याचा आहारात जास्त वापर करावा चटणी केली तर रोज खावु शकतो तसेच देवनागर नंतर भाजलेले जवस चमचा भर रोज घ्यावे. Shobha Deshmukh -
खोबर्याची चटणी (khobryachi chutney recipe in marathi)
संक्रांतीच्या दरम्यान भोगीची भाजी बनवली जाते आहे आणि ती आपल्या बाजरीच्या भाकरी सोबत शेजाऱ्यांना ताटातून देण्याची पद्धत पश्चिम महाराष्ट्रात आहे बाजरीच्या भाकरी वर भोगीची भाजी ,लोणी ,कांदा पात, गाजर मसाले भात ,खोबऱ्याची चटणी असे सर्व घालून ते ताट दिले जाते .चला तर खोबऱ्याची चटणी आपण बनवूयात. तसे खोबऱ्याची चटणी म्हटलं की फक्त खोबरे घालून बनवली जाते मात्र आता थंडी असल्यामुळे खोबर्याच्या चटणी त थोडेसे भाजलेले शेंगदाणे लसुन अजून थोडे तीळ घालून ही चटणी बनवणार आहोत Supriya Devkar -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5#W5थंडीत तीळ खाणे हे शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते. खमंग अशी लागणारी तिळाची चटणी तोंडाची चव तर वाढवतेच पण जेवणाची लज्जत पण वाढवते. Poonam Pandav -
जवस चटणी (jawas chutney recipe in marathi)
कॅल्शियम भरपूर असलेली जवस चटणी सर्वांनी अवश्य खावी Archana bangare -
तीळ कारळाची / खुरसणी चटणी (til chutney recipe in marathi)
#चटणी, #तीळ, #खुरसणी, #कारळ#Niger Seedsकारळे किंवा खुरसणी ही एक तेलजन्य बी आहे. त्यापासून केलेली कारळ्याची चटणी हा महाराष्ट्रीय जेवणातील एक पदार्थ आहे. ह्या मध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असतात, तसेच स्किन साठी अत्यंत फायदेशीर आहे.तीळ हाडे, तसेच शरीरातील जॉइन्ट्स चे काम सुरळीत ठेवते, यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. रोज तीळ चावून खाल्ल्यास शरीराचे बल वाढते. शिवाय दातही मजबूत होतात, इ .... Sampada Shrungarpure -
जवसाची चटणी (javasachi chutney recipe in marathi)
जवसाची चटणी माझ्या मुलीला खुप आवडते चपाती चटणी रोल करून खाणे तर तिला खुप आवडते खुपच पोष्टीक व चविष्ट लागते जवस चटणी. 😋😋 #cn Purna Brahma Rasoi -
जवसाची खमंग चटणी (javasachi chutney recipe in marathi)
#CN"जवसाची खमंग चटणी" आजकालच्या धकाधकीच्या जीवनात पौष्टिक आणि हेल्दी खाणे याकरता आपण बरेच शॉर्टकट्स वापरतो नाही का...!!! जवसाची चटणी हा त्यातील एक प्रकार, जवस काही प्रमाणात खाणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर ठरते...!! उपयुक्त अशी चरबी, फायबर आणि अँटीऑक्सिडन्ट चे प्रमाण यात मुबलक असून, वजन कमी करण्यासाठी याचा फायदा होत असल्याने आजकाल न्यूट्रिशनिस्ट पण जवसाचा आहारात वापर करण्यास सांगतात...!!चला तर मग आपण खमंग अशा चटणीची रेसिपी पाहूया Shital Siddhesh Raut -
तीळ, शेंगदाणे चटणी (Til Shengdana Chutney Recipe In Marathi)
#SORसुकी/ओली चटणी रेसिपीजआपल्या जेवणाच्या ताटात डाव्या बाजूलाचटणी पाहिजेच त्या शिवाय ताट पूर्ण होत नाही. आशा मानोजी -
शाही जवस चटणी (shahi javas chutney recipe in marathi)
#cnजवसाची चटणी आपण बरेचदा करतो.आज मी शाही जवस चटणी केली.एकदम मस्त झाली. Preeti V. Salvi -
कढीपत्ता चटणी (kadhipatta chutney recipe in marathi)
#GA4 #week4 गोल्डन ऍप्रॉन मध्ये चटणी हा कीवर्ड आला आहे. म्हणून मी आज कढीपत्ता चटणी ची रेसिपी पोस्ट करत आहे. कढीपत्ता आपण रोजच्या भाज्या मध्ये वापरतोच तो खूप पौष्टिक आणि आरोग्यदायी आहे. मी आज पौष्टिक अशी कढीपत्ता चटणी केली. Rupali Atre - deshpande -
जवसाची चटणी (javasachi chutney recipe in marathi)
#CN#जवस_ जवस खाल्ल्याने पचन क्रिया किंवा पित्त कमी करण्यासाठी मदत होते. आहारात जवसाचा वापर केल्यास भूक वाढते आणि पचनक्रिया देखील चांगली राहते. -दातासाठी जवस फार गुणकारी आहे. हिरड्या मजबूत होण्यासाठी आणि दात दुखत असेल तर जवसचं तेल फायदेशीर ठरते. Jyotshna Vishal Khadatkar -
तीळ जवस चटणी (til javas chutney recipe in marathi)
#EB5 #W5विंटर स्पेशल रेसिपीजE book challenge Shama Mangale -
टोमॅटो तीळ चटणी (Tomato Til Chutney Recipe In Marathi)
#SOR थंडी च्या दिवसा मधे तीळाचे पदार्थ खाणे फायदेशीर असते . तीळ हे उष्ण प्रकारात येत असल्यामुंळे हिवाळयात तीळाचे पदार्थ. पैकी चटणी सुकी पण करु शकतो व तीळ टेमॅटो चटणी खुप छान चटपटीत अशी होते. Shobha Deshmukh -
तीळ शेंगदाणा चटणी (til shengdana chutney recipe in marathi)
#cn एक मात्र नक्की, की या छोट्याशा दिसणाऱ्या तिळात पौष्टिकता मात्र भरपूर आहे. त्यामुळेच हजारो वर्षांपासून आपण तीळ आणि तिळाचं तेल वापरत आलो आहोत. Aparna Nilesh -
तिळ चटणी (til chutney recipe in marathi)
#विंटर स्पेशल रेसिपी#week 5#EB5विंटर स्पेशल रेसिपी ,तिळाची मिक्स जवस चटणी. दोन्हीही तैलिय पदार्थ असल्यामुळे हिवाळ्यात उपयुक्त चटणी चा चविष्ट प्रकार आहे. Suchita Ingole Lavhale
More Recipes
टिप्पण्या