सुंठवडा (sunthdvada recipe in marathi)

लता धानापुने
लता धानापुने @lata22

#गोकुळाष्टमी
#skm
#Learn_with_cookpad
"सुंठवडा"
श्रीकृष्ण,गोविंद, हरी, मुरारी, गोपाळ, कान्हा, श्रीधर, मुकूंद, मधुसूदन अशा अनेक नावांनी नावाजलेला..श्रावण वद्य अष्टमीला रात्री रोहीनी नक्षत्रावर चंद्र वृषभ राशीत असताना जन्म होतो भगवान श्रीकृष्णांचा.हजारो वर्षापासून आलेली या परंपरेचा आपण सर्व जण आपुलकीने, आनंदाने घरोघरी देवघरातील श्रीकृष्ण पाळण्यात घालून , सुंठवडा वाटून हा बाळकृष्ण जन्म साजरा करतो. सुंठवडा पुर्वी खोबरे, खारीक, सुंठ पावडर घालून करायचे,पण हल्ली ड्रायफ्रुट्स, डिंक,मखाना वैगेरे घालून अनेक प्रकारे बनवला जातो. म्हण आहे ना जितक्या नारी तितक्या परी त्यामुळे प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते.सुंठवडा अतिशय पौष्टिक आहार आहे.बाळंतीन बाईसाठी तर आवर्जून बनवला जातो..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
दहा बारा
  1. 1 कपसुके खोबरे किसून
  2. 1 कपखारीक बारीक तुकडे
  3. 7-8बदाम
  4. 7-8 काजू
  5. 7-8पिस्ता
  6. 1 टेबलस्पूनखसखस
  7. 1 टेबलस्पूनबडीशेप
  8. 1 टेबलस्पूनचारोळी
  9. 2 टेबलस्पूनसाखर
  10. 2 टेबलस्पूनसुंठ पावडर
  11. 1 टेबलस्पूनवेलचीपूड
  12. 1/4 टीस्पूनजायफळ पूड
  13. 10-12 मनुके

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    खोबरे किसून घ्या,खारीक तोडून त्यातील बी आणि वरच्या बाजूचे तोंड काढून घ्या व बारीक तुकडे करून घ्या.सगळे साहित्य एकत्र जमवून घ्या..

  2. 2

    पॅनमध्ये प्रथम खारीक चे तुकडे भाजून घ्या,मग काजू बदाम पिस्ता चारोळी हे भाजून घ्या.खसखस, बडीशेप भाजून घ्या.शेवटी खोबरे ही भाजून घ्या.. रंग न बदलता.

  3. 3

    भाजलेले जिन्नस वेगवेगळे काढून ठेवा.. कारण मिक्सरमध्ये वाटताना वेगवेगळे वाटायचे आहे.. खारीक कडक असते ती पहिली वाटून घ्या.

  4. 4

    आता ड्रायफ्रुट्स, साखर त्यात घालून वाटून घ्या.. त्यात वेलची पूड, जायफळ पूड, सुंठ पावडर घालून परत मिक्सरमध्ये फिरवून घ्या..व प्लेटमध्ये काढून घ्या

  5. 5

    खोबरे हातानेच कुस्करून घ्यावे.. किंवा आवडीनुसार मिक्सरमध्ये फिरवून घ्या.. सगळे वाटलेले मिश्रण व खोबरे आणि मनुके एकत्र मिक्स करा..

  6. 6

    वर बदाम पिस्त्याचे काप घालून सजवा.तुळशी पत्र ठेवून नैवेद्य दाखवा आणि सगळ्यांना सुंठवडा वाटा..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
लता धानापुने
रोजी

Similar Recipes