बहुगुणी सुंठवडा (sunthvada recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

#ngnr

सुंठाला' विश्वा’ असं दुसरं नाव आहे.
अनेक आजारांवर गुणकारी असल्याने त्याला ' विश्वऔषध’ असे म्हणतात.

चैत्र महिन्यात वसंत ऋतू असतो आणि या ऋतूत होणाऱ्या हवामानातील बदलांमुळे शरीरात कफ वाढतो. त्यामुळे सांधेदुखी, सर्दी-खोकला, ॲलर्जी असे त्रास होतात.
याचे कारण म्हणजे शरीरात न पचलेला भाग शरीरात काही इम्मफ्लामेंटरी बदल घडवून आणतो. प्रत्येकाची प्रतिकारशक्ती, वय, व्यवसाय व प्रकृतीनुसार शरीरात वेगवेगळे बदल होतात. शरीरात झालेल्या बदलांमुळे जडत्व येते, सुस्ती येते. तसंच या बदलांसाठी बाहेरील वातावरण पोषक असते. म्हणून या सगळ्याला आळा घालण्यासाठी सुंठ फार उपयुक्त ठरते. सुंठ अँटीइम्मफ्लामेंटरी, अँटीऑक्सिडेन्ट आणि कफ कमी करणारं आहे.
तसेच रामनवमी , हनुमान जयंती, जन्माष्टमीला सुंठवड्याचा प्रसाद घरोघरी बनवला जातो.
पाहूयात रेसिपी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४ ते ५ जणांसाठी
  1. 1 कपसुके किसलेले खोबरे
  2. 1सुठांचा तुकडा/आवडीनुसार
  3. 1/2 कपसाखर
  4. 3हिरवी वेलची
  5. 4खारीक चिरून
  6. 1/4 कपकाजू,बदाम
  7. 1/2 टेबलस्पूनखसखस
  8. 1 टीस्पूनपांढरे तीळ
  9. 1 टेबलस्पूनसाजूक तूप
  10. पिस्ता,मनूका आवडीप्रमाणे
  11. 1 टेबलस्पूनखडीसाखर

कुकिंग सूचना

  1. 1

    सुंठ खलबत्ता मध्ये ठेचून घ्या.

  2. 2

    पॅनमधे सुके खोबरे खमंग भाजून घ्या.

  3. 3

    काजू,बदाम तूपामधे खमंग भाजून घ्या. तीळ,खसखस ही भाजून घ्या.थंड करून घ्या.

  4. 4

    मिक्सरच्या भांड्यामधे साखर, खडीसाखर,सुंठ बारीक वाटून घ्या.

  5. 5

    नंतर त्यात सुके खोबरे,काजू बदाम,तीळ खसखस,वेलची,खारीक,मनूके घालून बारीक वाटून घ्या. (मी काळे मनूके घातले आहेत.)

  6. 6

    बारीक वाटल्यावर, पुन्हा एकदा सर्व छान मिक्स करून घ्या. खमंग, सुवासिक बहुगुणी सुंठवडा तयार आहे.

  7. 7

    श्रीकृष्णाला नैवैद्य अर्पण करावा...🙏🙏

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

Similar Recipes