रवा इडली रेसिपी (rava idli recipe in marathi)

Smita Kiran Patil
Smita Kiran Patil @myrecipe_2249
Sanpada Navi Mumbai

रवा इडली रेसिपी (rava idli recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
3 लोकांसाठी
  1. 2 वाटीरवा
  2. 4 चमचेतूप
  3. कोथिंबीर
  4. 3-4 हिरव्या मिरच्या
  5. तुकडाआल्याचा
  6. फोडणीसाठी मोहरी
  7. 1.5 वाटी दही
  8. 1/2 चमचाबेकिंग सोडा
  9. 1 चमचाहरभऱ्याची डाळ, थोडे काजूचे तुकडे
  10. चटणी साठी साहित्य
  11. 1नारळ
  12. 4हिरव्या मिरच्या
  13. कोथिंबीर कडीपत्ता
  14. भाजके डाळे
  15. फोडणीसाठी मोहरी हिंग कढीपत्ता

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    कढईमध्ये तूप घेऊन यामध्ये मोहरी टाकून तडतडू द्यावी कढीपत्ता घालावा एक चमचा हरभऱ्याची डाळ घालावी परतावे काजूचे तुकडे करून परतून घ्यावे हिरवी मिरची आणि किसलेला आलं घालून परतून घ्यावा रवा या तुपावर भाजून घ्यावा तीन ते चार मिनिटात रवा चांगला परतून घ्यावा

  2. 2

    रवा भाजल्यानंतर कढई खाली उतरवून घ्यावी थोडा थंड होऊ द्यावा

  3. 3

    आता यामध्ये अर्धा चमचा बेकिंग सोडा घालून मिक्स करून घ्यावा कोथिंबीर बारीक चिरून घालावी पहिल्यांदा अर्धी वाटी दही घालून मिक्स करून घ्यावं नंतर उरलेले दही घालावं मिक्स करून घ्यावं लागलं तर थोडं पाणी घालावं चवीप्रमाणे मीठ घालावे

  4. 4

    पाण्याच्या कन्सिस्टन्सी पहावी हे बॅटर जास्त पातळ सुद्धा करू नये इडली पात्राला तेलाचा हात लावून त्यामध्ये हे बॅटर घालावं दहा मिनिटं इडली पात्रामध्ये इडल्या उकडून घ्याव्यात

  5. 5

    खोबर्‍याच्या चटणी साठी खोबऱ्याचे पातळ काप करावे,कढीपत्ता,हिरवी मिरची,डाळ,मीठ जीरे थोडासा आलं कढीपत्ता कोथिंबीर घालून मिक्सर मध्ये फिरवून घ्यावा थोडा थोडा पाणी घालत बारीक चटणी वाटावी

  6. 6

    फोडणीच्या भांड्यात तेल घालावं हिंग मोहरीची फोडणी करावी कढीपत्ता घालावा हि फोडणी चटणीवर ओतावी यावर एक फोड लिंबू पिळावा

  7. 7

    इडली पात्रातून इडल्या बाहेर काढून दोन मिनिटे तसेच ठेवावे यात मग सुरीने इडल्या काढून चटणीबरोबर सर्व्ह कराव्यात

  8. 8

    खूपच टेस्टी इडली लागते मुलांना घरच्या सर्वाना खूपच आवडेल

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Smita Kiran Patil
Smita Kiran Patil @myrecipe_2249
रोजी
Sanpada Navi Mumbai

Similar Recipes