झनझनीत मसाला  आमटी (masala amti recipe in marathi)

Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642

#mfr
#वर्ल्डफुडडे
पुरण पोळी , भात ,कुरडई आणी गोडाबरोबर झनझनीत आमटी खांदेश मध्ये पुरणाच्या स्वयंपाकात भाता बरोबर ही आमटी केली जाते मी झटझपट बनवली आहे. माझाही फेवरेट रेसिपी कशी झालीय बघूया .

झनझनीत मसाला  आमटी (masala amti recipe in marathi)

#mfr
#वर्ल्डफुडडे
पुरण पोळी , भात ,कुरडई आणी गोडाबरोबर झनझनीत आमटी खांदेश मध्ये पुरणाच्या स्वयंपाकात भाता बरोबर ही आमटी केली जाते मी झटझपट बनवली आहे. माझाही फेवरेट रेसिपी कशी झालीय बघूया .

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

चाळीस मिनिट
3_4 सर्व्हींग
  1. 2मोठे कांदे
  2. 1 टेबलस्पूनडाळव (यात शिजलेली चना डाळ व पाणी वापरतात. पण मी झटपट बनवली आहे म्हणून डाळव वापरले)
  3. 7-8 लसून कळ्या
  4. 3 टेबलस्पूनखोबरा काप
  5. 3 टीस्पूनधना पावडर
  6. 1-1/2 टीस्पूनकाळा मसाला
  7. 2 टीस्पूनलाल तिखट आवडीने कमी अधिक करू
  8. 1/4 टीस्पूनहळद
  9. 1/2 टीस्पूनमोहरी
  10. 2 टीस्पूनमीठ
  11. 4-5 टेबलस्पून तेल (फोडणीसाठी)
  12. 1 टेबलस्पूनमसाला भाजण्यासाठी

कुकिंग सूचना

चाळीस मिनिट
  1. 1

    सगळे साहित्य जमा करून घ्या. कांदा उभे काप चिरून घ्या. लसूण सोलून घ्या. खोबरा काप करून घ्या.

  2. 2

    आता डाळव,खोबरा काप,कांदा वेग वेगळे भाजून घ्या.

  3. 3

    आत् कढईत एक टेबलस्पून तेल घालून गरम करा त्यात धना पावडर व मसाला परतून घ्या. गॅस लगेचच बंद करा.

  4. 4

    मिक्सरमधून लसूण व तिखट थोड पाणी घालून वाटून घ्या. ही पेस्ट बाजूला काढून घ्या. नंतर मसाला,कांदा,खोबरा मिक्सरमधून वाटून घ्या

  5. 5

    कढईत तेल घालून गरम करा. मोहरी घालून तडतडले कि त्यात लाल पेस्ट घाला तेल सुटेपर्यंत परतून घ्या त्यात मसाला पेस्ट घाला तेल सुटेपर्यंत परतून घ्या. हळद व मीठ घालून घ्या.

  6. 6

    आता त्यात पाणी घालून चांगले लोमिडियम फ्लेमवर उकळायला ठेवा.

  7. 7

    चांगले लो फ्लेमवर उकळायला ठेवा म्हणजे तेल चांगले सुटते.आणि पुरण पोळी,कुरडई,,भात आमटी सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes