नाचणीचे आंबील (nachniche ambil recipe in marathi)

Smita Kiran Patil
Smita Kiran Patil @myrecipe_2249
Sanpada Navi Mumbai

#HLR
नाचणीला काही भागात नागली असे म्हणतात. तर इंग्रजीत रागी किंवा फिंगर मिलेट म्हणतात.
नाचणी पचायला हलकी असते आजारातून उठलेल्या साठी नाचणी एकदम उत्तम आहे नाचणी खाऊन पोटाच्या तक्रारी होत नाही थंड रक्तदोष दूर करणारे पित्तशामक आहे दूध साखर टाकून नाचणी सत्व किंवा खीर लहान मुलांना तसेच वयस्कर लोकांसाठी सुद्धा खूप उत्तम आहे नाचणीमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस चे प्रमाण भरपूर आहे हाडांचे आजार असणाऱ्यांना नाचणी हा एक योग्य पर्याय आहे असे एक ना अनेक नाचणी खाण्याचे फायदे आहेत लहान बाळापासून वयोवृद्धांपर्यंत तुम्ही सर्वांना देऊ शकता

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

वीस मिनिटात
3 लोकांसाठी
  1. 4 चमचेनाचणीचे पीठ
  2. 1फुलपात्र ताक
  3. 2हिरव्या मिरच्या
  4. 3-5 कढीपत्ता
  5. कोथिंबीर
  6. फोडणीसाठी जीरे ,मोहरी, हिंग
  7. 2 चमचेतूप
  8. 3-4 पाकळ्या लसूण

कुकिंग सूचना

वीस मिनिटात
  1. 1

    नाचणीचे पीठ टाका मध्ये कालवून घ्या गुठळी व्हायला नको छान मिक्स करून घ्या

  2. 2

    एका पातेल्यात तूप तापत ठेवा जीरे मोहरी हिंग कढीपत्ता मिरची फोडणी करा लसूण परतून घ्या तुम्ही हे लोखंडी कढई मध्ये केले तर अजून छान

  3. 3

    ताकामध्ये कालवलेलं नाचणीचे पीठ फोडणीमध्ये ओता एक ते दीड ग्लास पाणी घाला चमच्याने सतत ढवळत रहा चवीप्रमाणे मीठ साखर घाला पाच मिनिट हे पीठ छान शिजू द्या लागलं तर थोडंसं पाणी घाला

  4. 4

    वरून कोथिंबीर घाला यामध्ये एक चमचा तूप सोडून गरम गरम प्यायला द्या

  5. 5

    ब्रेकफास्टमध्ये हा खूप छान पर्याय आहे आणि पौष्टीक सुद्धा आहे याने पोट सुद्धा भरते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Smita Kiran Patil
Smita Kiran Patil @myrecipe_2249
रोजी
Sanpada Navi Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes