नाचणीचे आंबील

#goldenapron3 #12thweek#lockdown
Curd ह्या की वर्ड साठी उन्हाळ्याच्या दिवसात दही घालून जे नाचणीचे आंबील बनवले जाते ,जे पौष्टीक आणि थंड आहे त्यामुळे उन्हाळ्याचा त्रास होत असेल तर तो कमी होतो,ते बनवले आहे,.पूर्वी पौष्टीक नाश्ता म्हणून उन्हाळ्यात नाचणीची आंबील पीत असत.
नाचणीचे आंबील
#goldenapron3 #12thweek#lockdown
Curd ह्या की वर्ड साठी उन्हाळ्याच्या दिवसात दही घालून जे नाचणीचे आंबील बनवले जाते ,जे पौष्टीक आणि थंड आहे त्यामुळे उन्हाळ्याचा त्रास होत असेल तर तो कमी होतो,ते बनवले आहे,.पूर्वी पौष्टीक नाश्ता म्हणून उन्हाळ्यात नाचणीची आंबील पीत असत.
कुकिंग सूचना
- 1
नाचणीच्या पिठात १ पेला पाणी घालून रात्रभर भिजवावे म्हणजे ते आंबते.सकाळी कढईत १ पेला पाणी उकळून त्यात हळूहळू हे भिजवलेले पीठ सोडून ढवळावे.म्हणजे गुठळ्या होत नाहीत.
- 2
हे उकळताना त्यात आलं,लसूण,मिरची ठेचून घालावी,मीठ,जिरेपूड घालावी.
- 3
छान उकळी आली की नाचणीचे पिठ व्यवस्थित शिजते.ते थंड करून घ्यावे.त्यात दह्यात तिप्पट पाणी घालून व्यवस्थित घुसळलेले ताक हळूहळू घालून मिक्स करावे.वरून कोथिंबीर पेरावी.
- 4
थंडगार आंबील पिण्यासाठी तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
नाचणीचे आंबिल (nachniche ambil recipe in marathi)
#KS1 #कोकण रेसिपीज कोकणातील तांदळाबरोबरच टिकणारी एक प्रमुख पीक म्हणजे नाचणी.. नाचणी अतिशय थंड गुणधर्माची असल्याने उन्हाळ्यामध्ये विशेष करून त्याचा जास्त उपयोग केला जातो.. या नाचणीपासून कोकणामध्ये मुख्यत: भाकरी नाचणीची खीर नाचणीचे आंबील नाचणीचे लाडू वड्या इत्यादी पदार्थ आवर्जून केले जातात आणि आपल्या शरीरामध्ये थंडावा कायम टिकावा उन्हाळ्याचा त्रास होऊ नये म्हणून हे पदार्थ घरोघरी केले जातात..चला तर मग आपण पण beat the heat करण्यासाठी नाचणीची आंबिल कशी करायची ते बघू.. Bhagyashree Lele -
ज्वारीचे गोड आंबील...उन्हाळा स्पेशल
#goldenapron3 #12thweek#lockdown curdह्या की वर्ड साठी ज्वारीचे गोड आंबील बनवले आहे. महालक्ष्मीला नेवैद्य म्हणून काही ठिकाणी हे बनवले जाते...गोड आणि तिखट दोन प्रकारे बनवतात...खास करून उन्हाळ्यात बनवतात. Preeti V. Salvi -
नाचणीचे आंबील (nachniche ambil recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीनाचणी मध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस खूप प्रमाणात असते. नाचणी पित्तशामक, थंड आणि रक्तदोष कमी करणारी आहे. नाचणी भुकेची तीव्रता नियंत्रणात ठेवते. Shama Mangale -
ज्वारीच्या कन्या व नाचणीची आंबील (nachnichi ambil recipe in marathi)
#FD भारतीय पारंपरिक नाश्ता हा विषय पाककृती करण्यासाठी मिळाला आणि आनंद वाटला कारण यात वेगळं काही फार विचार करून करावं लागणार नाही कारण या विषयाला धरूनच रोज आपल्या घरी नाश्ता बनवला जातो . या विषयावर आधारित एकदम जुना व करायला अतिशय सोपा आणि खायला अतिशय पौष्टिक पदार्थ मी आज सादर करत आहे ,ते म्हणजे ज्वारीच्या कन्या व नाचणीची आंबील. वयाच्या 6-7 महिन्या पासून ते म्हातारपणी पर्यंत हा पदार्थ लोकप्रिय आहे .नाचणी तर लोहयुक्त, कौल्शिअयम, प्रोटिन युक्त असून रक्त वाढिसाठी एक उत्तम पर्याय ,उन्हाळ्यात तर शरीरातील उष्णतेचा दाह कमी करणारी बहुगुणी नाचणी तिचे सांगावे तितके गुण कमी आहेत.ज्वारी तर आपला पारंपरिक आहारातील घटक वेट लॉस साठी ज्वारी एक उत्तम पर्याय ,पचायला हलकी जीवनसत्त्व युक्त ज्वारी म्हणजे वरदानच आहे. ज्वारीच्या कन्या व नाचणीची आंबील हा पूर्वीच्या लोकच्यातील नाश्त्यासाठी चा प्रमुख पदार्थ.असं मी ऐकलय की बाळूमामा च्या देवळात याच ज्वारीच्या कण्याचा व नाचणीच्या आंबील चा प्रसाद असतो.हा पदार्थ तुम्ही 12 महिने करू शकता खाऊ शकता त्याचा काही त्रास होत नाही.ज्वारीच्या कन्या करण्यासाठी ज्वारीची भरड/रवा वापरतात तो मी एकदमच गिरणीतूनच बनवून आणते,घरी पण ज्वारी तुम्ही मिक्सर मध्ये भरडून कन्या बनवू शकता.ज्वारीच्या कन्या व नाचणीची आंबील हे दोन्हीही तुम्ही गरम अथवा थंड ही खाऊ शकता. तर मग बघूयात या कश्या करायच्या ते... Pooja Katake Vyas -
मठ्ठा (mattha recipe in marathi)
#goldenapron3 #curd आता उन्हाळ्याच्या दिवसात सतत काही तरी थंड प्यावस वाटत फळांचे ज्युस कोलड्रींक हे तर चालुच असत पण अजुन शरीरात थंडावा यावा असे पौष्टीक ड्रिंक म्हणजे मठ्ठा हा दहयापासुन बनवतात चला तर आपण बघुया मठ्ठा कसा बनवायचा ते Chhaya Paradhi -
पापड रायता
#goldenapron3 #12thweek#lockdown raita ,curd ह्या की वर्ड साठी पापड रायता बनवला आहे. Preeti V. Salvi -
नाचणीची आंबील (nachnichi ambil recipe in marathi)
#trending समर स्पेशल ड्रिंक म्हणाल तर माझ्यासाठी नाचणीची आंबील हे एक नंबर वर आहे.नाचणी फायबर युक्त असून तिच्या सेवनाने रक्तवाढी ला मदत होते ,तसेच कोलेस्टेरॉल कमी करते ,रक्तातील शर्करेचे प्रमाण योग्य ठवते अशी ही बहुगुणी नाचणी लहान बाळापासून वृद्ध व्यक्ती पर्यंत सगळ्यांना अतिशय उपयुक्त आहे.म्हणूनच मी आज या नाचणीच्या आंबील ची रेसिपी शेयर करत आहे अगदी सोपी व पौष्टिक अंबिल कशी करायची ते बघू.. Pooja Katake Vyas -
नाचणीचे आंबील (nachniche ambil recipe in marathi)
#HLRनाचणीला काही भागात नागली असे म्हणतात. तर इंग्रजीत रागी किंवा फिंगर मिलेट म्हणतात.नाचणी पचायला हलकी असते आजारातून उठलेल्या साठी नाचणी एकदम उत्तम आहे नाचणी खाऊन पोटाच्या तक्रारी होत नाही थंड रक्तदोष दूर करणारे पित्तशामक आहे दूध साखर टाकून नाचणी सत्व किंवा खीर लहान मुलांना तसेच वयस्कर लोकांसाठी सुद्धा खूप उत्तम आहे नाचणीमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस चे प्रमाण भरपूर आहे हाडांचे आजार असणाऱ्यांना नाचणी हा एक योग्य पर्याय आहे असे एक ना अनेक नाचणी खाण्याचे फायदे आहेत लहान बाळापासून वयोवृद्धांपर्यंत तुम्ही सर्वांना देऊ शकता Smita Kiran Patil -
आंबील (ambil recipe in marathi)
#रेसिपीबुक week2 ... लातूर भागात आंबील हे खूप लोकप्रिय, प्रसिद्ध आहे. दर्श वेळ अमावस्येला हे खास करून बनवले जाते. ह्या दिवशी शेतात पूजा करता तेव्हा आंबील, भज्जी, खीर, वरण भात हे प्रसाद म्हणून बनवले जाते. शेतातच कोपीची पूजा करून सर्वजण शेतात जेवण करतात. Jyoti Kinkar -
नाचणीची भाकरी (nachnichi bhakhri recipe in marathi)
#GA4#Key Words 20#Ragi (नाचणी)# (मऊसूत डिझाईन नाचणीची भाकरी)नाचणी (इंग्रजी: Finger Millet / Ragi) हा धान्याचा एक प्रकार आहे. कोकण आणि डांग[१](गुजरात) प्रांतात नाचणीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. नाचणीचा उपयोग भाकरी आणि आंबील बनवण्यासाठी होतो. Archana Sunil Ingale -
नाचणीची आंबील (nachani ambil recipe in marathi)
#नाचणीची आंबील सकाळच्या नाष्ट्या साठी पौष्टीक रेसिपी आहे. शरीराला थंडावा मिळतो व पोटही भरते करायला सोपी रेसिपी चला तर बघुया कशी करायची ते Chhaya Paradhi -
रस्सम
#goldenapron3 #12thweek#lockdown tomato, pepper ह्या की वर्ड साठी साऊथ इंडियन स्पेशल रस्सम बनवले आहे. Preeti V. Salvi -
नाचणीचे पौष्टिक घावणे (nachniche paushtik ghavne recipe in marathi)
#Ga4#week20#keyword_Ragiनाचणीचे पौष्टिक घावणेनाचणी पौष्टिक असते पण फारशी कुणाला आवडत नाही.घावणे केले की छान लागतात.चला मग घावणे करूया Shilpa Ravindra Kulkarni -
कढी पकोडे
#goldenapron3 #12thweek#lockdownCurd ह्या की वर्ड साठी कढी पकोडे भात केला आहे. भजी मिश्रा डाळींची केली आहेत.नेहमी चण्याच्या पिठाची भजी करतो.मिक्स डाळी भिजवलेल्या होत्या म्हणून त्यापासून भजी केली. Preeti V. Salvi -
नाचणीचे आंबील (nachniche ambil recipe in marathi)
#HLRनाचणीला काही भागात नागली असे म्हणतात. तर इंग्रजीत रागी किंवा फिंगर मिलेट म्हणतात.नाचणी पचायला हलकी असते आजारातून उठलेल्या साठी नाचणी एकदम उत्तम आहे नाचणी खाऊन पोटाच्या तक्रारी होत नाही थंड रक्तदोष दूर करणारे पित्तशामक आहे दूध साखर टाकून नाचणी सत्व किंवा खीर लहान मुलांना तसेच वयस्कर लोकांसाठी सुद्धा खूप उत्तम आहे नाचणीमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस चे प्रमाण भरपूर आहे हाडांचे आजार असणाऱ्यांना नाचणी हा एक योग्य पर्याय आहे असे एक ना अनेक नाचणी खाण्याचे फायदे आहेत Smita Kiran Patil -
🍂थंडाई एक पौष्टिक पेय.
असे म्हणतात नियमितपणे थंडाई प्यायल्याने आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होते.उन्हाळ्याच्या दिवसात बहुतेक लोकांना उन्हाळ्याचा त्रास होतो.अशावेळी एक ग्लास थंडाईचे सेवन करावे.यामुळे शरीर थंड राहते, P G VrishaLi -
नाचणीचे लाडू (nanchniche ladoo recipe in marathi)
#GA4 #week14 #Ladooसध्या थंडीचा सिझन आहे. त्यामुळे भरपूर पौष्टीक खाद्यपदार्थ बनवण्याकडे महिला भगिणींचा कल असतो. भरपूर ड्रायफ्रूट्स्, तूप , डिंक , अळीव यांचा वापर करून विविध प्रकारचे पौष्टीक लाडू बनवले जातात. थंडीच्या दिवसात भूकही लागते आणि अन्नपचनही चांगले होते. भरपूर व्यायाम करून पौष्टीक आहार घेवून आपल्याला आपले स्वास्थ्य चांगले राखता येते. म्हणूनच मी आज भरपूर कॅल्शिअम असलेल्या नाचणीचे थोड्या वेगळ्या प्रकारचे लाडू केले आहेत. तुम्हीही नक्की प्रयोत्न करून बघा. लाडूचा रंग काळपट दिसतो पण चवीला खूपच छान लागतात. Namita Patil -
नाचणीचे पौष्टिक धपाटे (Nachniche dhapate recipe in marathi)
मी सोनाली सूर्यवंशी यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.रेसिपी मध्ये मी थोडा बदल केला आहे. एक कांदा चिरून घातलेला आहे.खूप छान झाले, नाचणीचे पौष्टिक धपाटे. Sujata Gengaje -
आंबील (ambil recipe in marathi)
#वीक ट्रेडिंग रेसिपीआंबील हा पदार्थ पारंपारिक आहे विदर्भामध्ये ज्वारीचा आंबील महालक्ष्मीला नैवेद्यासाठी बनवतात पश्चिम महाराष्ट्रात वास्तुशांती, गारवा अशा कार्यक्रमांमध्ये आंबील आवर्जून केले जाते आंबील हे खूप पौष्टिक असते. नाचणीच्या पिठाचे आंबील सुद्धा केले जाते नाचणीचे आंबील लहान मुलांना ,बाळंतिणीला सकाळी नाश्त्यासाठी प्यायला देतात.मी आज तुम्हाला ज्वारीच्या पिठाचे आंबील करून दाखवणार आहे Smita Kiran Patil -
फोडणीचे दही
#lockdown#goldenapron3 #10thweek curd ह्या की वर्ड साठी फोडणीचे दही केले आहे. भाजी नसेल तर किंवा भाज्या खाउन कंटाळा आलं तर ही रेसिपी बदल म्हणून नक्की करता येते.पोळी किंवा भाकरीसोबत मस्त लागते. Preeti V. Salvi -
मुगाची खिचडी, कढी, कुरडई,पापड
#lockdown#goldenapron3 #10thweek curd, rice ह्या की वर्ड साठी मुगाची खिचडी , दह्या पासून कढी ,पापड,कुरडई असा बेत केला आहे.घरात भाजी नसेल तरी जेवणासाठी हा उत्तम पर्याय आहे. Preeti V. Salvi -
नाचणीची भाकरी (nachnichi bhakhri recipe in marathi)
#GA4 #Key Words 20 #Ragi (नाचणी) # (मऊसूत डिझाईन नाचणीची भाकरी) नाचणी (इंग्रजी: Finger Millet / Ragi) हा धान्याचा एक प्रकार आहे. कोकण आणि डांग१ प्रांतात नाचणीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. नाचणीचा उपयोग भाकरी आणि आंबील बनवण्यासाठी होतो. Archana Ingale -
उन्हाळा स्पेशल नाचणी,काकडी,गाजर चिला (nachni kakdi gajar chilla recipe in marathi)
उन्हाळा वाढला की स्वभावतः शीत पदार्थ खाल्ले की उन्हाळ्याचा त्रास होत नाही.नाचणी ,काकडी थंड असते ,गाजर ह्या सिझन मध्ये छान मिळतात आणि व्हिटॅमिन ने भरपूर ,नाचणी मध्ये ही कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते.नाश्ता किंवा जेवणासाठी मस्त पदार्थ आहे. Preeti V. Salvi -
रवा केक
#goldenapron3 #12thweek curd ह्या की वर्ड साठी दही घालून केलेला रवा केक केला आहे. Preeti V. Salvi -
दही बुंदी (dahi bundi recipe in marathi)
#GA4 #week1#curdकर्ड हा वर्ड घेऊन ही दही बुंदी बनविली Aparna Nilesh -
दही वडे
#goldenapron3 week 7 curdचढत्या उन्हाळ्यात जीवाला थंडावा देणारे पदार्थ जास्त खावेत. पाणी, ताक, दही, सरबत इत्यादी पेय भरपूर प्रमाणात घेतली पाहिजेत. त्याच बरोबर खाण्यासाठी दहीवडे हा एक छान पदार्थ आपल्याला थंडावा देऊन जातो. Ujwala Rangnekar -
ज्वारीच्या पिठाची आंबील (jowari pithache ambil recipe in marathi)
#KS7# लॉस्ट रेसिपीज. माझे आजोबा पूर्वी उन्हाळ्यात ऊन लागू नये म्हणून रोज सकाळी ज्वारीच्या पिठाची आंबील पिऊन शेतात कामाला जायचे. हल्लीच्या काळात मुलांना हा प्रकार माहीतच नाही. Priya Lekurwale -
-
नाचणीचे सतू (सत्व) (nachniche satva recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 #सात्विक . सात्विक थीम दिल्यावर सर्व प्रथम नजरेसमोर आलेला पदार्थ. नाचणी चे भरपूर फायदे आहेत. त्याच्या भाकरी सुद्धा अतिशय उत्तम लागते. नाचणी मध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम, प्रथिने, लोह,असते, शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी आवश्यक तंतूमय पदार्थ असतात. नाचणी थंड असल्याने शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी मदत होते. चला अश्या आरोग्यदायी नाचणीचे सतू करू. आता जी पद्धत आपण पाहणार आहोत ती अगदी फास्ट होते. पूर्वी सतू म्हटले की भरपुर कष्टाचे वाटायचा पण ह्या पद्धतीने केले तर नक्कीच जास्त वेळा हा पदार्थ केला जाईल. Veena Suki Bobhate
More Recipes
टिप्पण्या