व्हेज चीज तवा सँडविच.(Veg cheese tawa sandwich recipe in marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#SFR

#स्ट्रीट_फूड_रेसिपीज

#व्हेज_चीज_सँडविच

स्ट्रीट फूड मधील सर्वांचे आवडीचे सँडविच म्हणजे व्हेज चीज सँडविच..अतिशय सोपे,बेसिक असे हे व्हेज चीज तवा सँडविच कमालीचे चविष्ट चवदार असते..त्यामुळेच ये दिल मांगे मोअर करत करत कधी 3-4 सँडविचेसचा फडशा पडतो हे कळत देखील नाही..😜

व्हेज चीज तवा सँडविच.(Veg cheese tawa sandwich recipe in marathi)

#SFR

#स्ट्रीट_फूड_रेसिपीज

#व्हेज_चीज_सँडविच

स्ट्रीट फूड मधील सर्वांचे आवडीचे सँडविच म्हणजे व्हेज चीज सँडविच..अतिशय सोपे,बेसिक असे हे व्हेज चीज तवा सँडविच कमालीचे चविष्ट चवदार असते..त्यामुळेच ये दिल मांगे मोअर करत करत कधी 3-4 सँडविचेसचा फडशा पडतो हे कळत देखील नाही..😜

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनीटे
4जणांना
  1. 1ब्रेड पँकेट
  2. बटर
  3. चीज स्लाईसेस किंवा क्युब्ज
  4. हिरवी चटणी
  5. टोमॅटो केचप
  6. प्रत्येकी 2 कांदा,टोमॅटो, सिमला मिरच्या यांच्या गोल पातळ चकत्या
  7. चाट मसाला आवडीनुसार
  8. काळी मिरी पावडर आवडीनुसार
  9. रेड चिली फ्लेक्स,ओरेगँनो मिक्स करुन
  10. सैंधव मीठ
  11. उकडलेला बटाटा कुस्करून किंवा चकत्या

कुकिंग सूचना

20 मिनीटे
  1. 1

    सर्व साहित्याची पूर्वतयारी करुन घ्या.

  2. 2

    ब्रेडच्या स्लाईसेसना बटर लावून घ्या.नंतर एका स्लाईसला हिरवी चटणी तर दुसर्या स्लाईसला टोमॅटो केचप लावून घ्या.

  3. 3

    आता चटणी लावलेल्या स्लाईस वर टोमॅटो, कांदा,सिमला मिरचीच्या चकत्या ठेवा. त्यावर चाट मसाला,सैंधव मीठ,काळी मिरी पूड घाला.

  4. 4

    आता यावर चीज स्लाईस किंवा किसलेले चीज घाला..त्यावर रेड चिली फ्लेक्स,ओरेगँनो घाला..आता यावर कुस्करलेला बटाटा घाला.. वरुन चाटमसाला,सैंधव मीठ घाला..

  5. 5

    यावर आता टोमॅटो केचप लावलेली स्लाईस ठेवा.आणि वरुन बटर लावा.

  6. 6

    आता तवा गरम करुन त्यात थोडे बटर घालून त्यावर हे स्लाईस ठेवून दोन्ही बाजूने हे सँडविच सोनेरी खरपूस भाजून घ्या.तयार झाले आपले व्हेज चीज तवा सँडविच..

  7. 7

    एका डिशमध्ये गरमागरम चविष्ट सँडविचेस परत वरुन बटर लावून टोमॅटो केचप सोबत सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes