मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)

Indrayani Kadam
Indrayani Kadam @khada_masala

#EB1
#W1
थंडीच्या दिवसात भरपूर प्रमाणात मिळणारी ही भाजी आरोग्यवर्धक आहे. वजन वाढीवर, रक्तातील साखरेवर नियंत्रण मिळवण्यासाठी मेथी उपयुक्त आहे.

मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)

#EB1
#W1
थंडीच्या दिवसात भरपूर प्रमाणात मिळणारी ही भाजी आरोग्यवर्धक आहे. वजन वाढीवर, रक्तातील साखरेवर नियंत्रण मिळवण्यासाठी मेथी उपयुक्त आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
4 सर्व्हिंग्ज
  1. 1जुडी मेथी
  2. 4 वाट्याकणिक
  3. 2 चमचेबेसन
  4. 2 चमचेलाल मिरची पावडर
  5. 1/2 चमचाहळद
  6. 1 चमचाआले लसूण पेस्ट
  7. 1 चमचाधणे जीरे पूड
  8. आवश्यकतेनुसार तेल आणि मीठ

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    प्रथम मेथी निवडून धुवून चिरून घ्या (मेथी निवडताना देठांचा भाग घेऊ नका)

  2. 2

    एका पसरट भांड्यात चिरलेली मेथी, कणिक, बेसन, आलं लसूण पेस्ट, मिरची पावडर, हळद, धणे जीरे पूड, एक चमचा तेल आणि मीठ घालुन मिक्स करा.

  3. 3

    आवश्यकतेनुसार पाणी टाकून घट्ट मळून घ्या.

  4. 4

    तेलाचा हाथ लावून पाच ते दहा मिनिटे कणिक झाकून ठेवा.

  5. 5

    थोड्या वेळाने भिजवलेल्या पिठाचे गोळे करून त्याची छोटी पोळी लाटता. पोळीला आतून तेल लावून त्रिकोणी घडी घाला आणि परत पोळी लाटा. तयार पराठा तेल लाऊन खरपूस भाजा. आणि दही किंवा लोण्याबरोबर खायला घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Indrayani Kadam
Indrayani Kadam @khada_masala
रोजी
लहापणापासूनच स्वयंपाकाची आणि त्यात वेगवेगळे प्रयोग करण्याची आवड. यातूनच khada masala blogspot या ब्लॉग ची सुरुवात झाली.माझ्या लहानपणी मोबाईल किंवा कॉम्प्युटर हे फक्त सिनेमा किंवा मालिकांमध्ये दिसायचे पण आमच्या घरी अधूनमधून वर्तमानपत्र यायचे आणि त्यात कुठेतरी कोपऱ्यात पाककृती असायची ते पाहून मी खूप पदार्थ बनवले आहेत. कधी जमायचे कधी फसायचे पण प्रयोग कधी बंद झाले नाहीत. पुढे हीच आवड मुलांना पौष्टिक आणि आरोग्यवर्धक पदार्थ खाऊ घालण्यासाठी उपयोगी आला. अजूनही माझा जास्तीत जास्त वेळ स्वयंपाक घरातच जातो. वेगवेगळे पदार्थ बनवणं, खाऊ घालणं आणि त्यातून होणारे कधी कौतुक तर कधी हसे या सगळ्याचा मी मनापासून आनंद घेते.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes