पिठलं कोथिंबीर वडी (pithla kothimbir vadi recipe in marathi)

Sushma pedgaonkar
Sushma pedgaonkar @Sushma_Pedgaonkar

#EB1 #W1
नेहमी पेक्षा थोडी हटके पिठलं कोथिंबीर वडी अगदि कमी वेळात तयार होते आणि तेल पण जास्त जागत नाही थंडी मध्ये अगदी खाण्या साठी मस्त लागते

पिठलं कोथिंबीर वडी (pithla kothimbir vadi recipe in marathi)

#EB1 #W1
नेहमी पेक्षा थोडी हटके पिठलं कोथिंबीर वडी अगदि कमी वेळात तयार होते आणि तेल पण जास्त जागत नाही थंडी मध्ये अगदी खाण्या साठी मस्त लागते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२०- मि
४/५- लोक
  1. 1 वाटीबेसन पिठ
  2. 1 वाटीकोथिंबीर बारीक चिरून
  3. 2 टेबलस्पून पांढरे तिळ
  4. 2 टेबलस्पून धना पावडर
  5. चवी पुरत मीठ
  6. 1 टेबलस्पूनहळद
  7. 1/2 टीस्पून हिंग
  8. 3 टेबलस्पून लसन आणि हिरवी मिरची पेस्ट
  9. पिठ भिजवण्या साठी पाणी
  10. तडक्या साठी
  11. 3 टेबलस्पून तेल
  12. 1 टेबलस्पून जिर
  13. 1 टेबलस्पून मोहरी
  14. 2-3 टेबलस्पून सुक्या खोबर्‍याचा किस
  15. 2 टेबलस्पून खसखस

कुकिंग सूचना

२०- मि
  1. 1

    सर्वात आधी एक वाटी बेसन पीठ एक वाटी पाण्यात भिजवून घेणे (पीठ भज्याच्या पिठाप्रमाणे भिजवणे)

  2. 2

    नंतर त्या पिठामध्ये हिंग, हळद, मीठ,पांढरी तील,धने पूड, हे सर्व घालून मिक्स करून घ्यावे

  3. 3

    नंतर एका पॅन मध्ये तेल गरम करून घ्यावे त्यात जीरे आणि मोहरी टाकावी वडताडले की त्यामध्ये हिंग हळद हिरवी मिरची आणि लसुन एकत्र वाटलेली टाकावे नंतर त्यात एक वाटी स्वच्छ धुऊन बारीक चिरलेली कोथिंबिरी घालावी व २/३ मि परतून घ्यावे

  4. 4

    परतून आल्या वरती त्यात मिक्स केलेले पिठ टाकावे आणि त्याला २/३ वाफा घ्याव्यात

  5. 5

    नंतर एका ताटाला तेल लावावे आणि त्यात हे तयार केलेले पिठले थोपवून घ्यावे नंतर
    त्यावरती सुके खोबर खिस आणि खसखस घालावी व त्याच्या वड्या पाडाव्यात आशा प्रकारे पिठल कोथिंबीर वडी तयार होते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sushma pedgaonkar
Sushma pedgaonkar @Sushma_Pedgaonkar
रोजी

Similar Recipes