कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)

Pooja Kale Ranade
Pooja Kale Ranade @Pet_Po0ja

#EB1
#W1
कोथिंबीर वडीची ही पद्धत मी लग्न झाल्यानंतर सासुबाईंकडून शिकले.

कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)

#EB1
#W1
कोथिंबीर वडीची ही पद्धत मी लग्न झाल्यानंतर सासुबाईंकडून शिकले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
4 जणांसाठी
  1. 3 कपकोथिंबीर बारीक चिरून
  2. 2 कपहरभरा डाळीचे पिठ
  3. चिमूटभरहिंग
  4. 2 चमचेहळद
  5. 5-6हिरव्या मिरच्या वाटून घेऊन
  6. 3 चमचेतीळ
  7. पाणी
  8. लिंबु रस
  9. मीठ चवीनुसार
  10. तेल (फोडणीसाठी आणि तळण्यासाठी)
  11. 1/2 चमचामोहरी
  12. 1/2 चमचाजीरे

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    प्रथम एका भांड्यात कोथिंबीर, डाळीचे पीठ एकत्र घ्यावे. आता त्यामध्ये बारीक वाटलेली मिरची, तीळ, चिमुटभर हिंग, 1 चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालून सर्व एकत्र करून घ्यावे. नंतर त्यात गरजेनुसार पाणी घालून पिठ थोडेसे पातळ भिजवावे आणि नंतर त्यात चवीसाठी थोडासा लिंबुरस घालावा. पिठात गुठळी नसावी.

  2. 2

    आता एक नॉनस्टिक कढई गॅसवर गरम करत ठेवून त्यात थोडेसे तेल घ्यावे आणि तेल गरम झाल्यानंतर त्यात अनुक्रमे मोहरी, जीरे, थोडेसे हिंग आणि हळद घालून फोडणी करावी.

  3. 3

    आता वरील फोडणीत आपण तयार केलेले कोथिंबीर आणि डाळीच्या पिठाचे मिश्रण ओतावे आणि ते एकसारखे ढवळत राहावे जेणेकरून त्याची गुठळी होणार नाही आणि ते एकसारखे शिजेल

  4. 4

    पिठ न थांबता त्याचा गोळा होईपर्यंत एकसारखे ढवळत राहावे, आणि त्याचा गोळा झाल्यानंतर एका डिश ला अथवा ट्रे ला तेल लावून त्यावर तो गोळा काढून एकसारखा थापून घ्यावा

  5. 5

    आता पिठ एकसारखे ताटात थापून झाले की आपल्या आवडीप्रमाणे त्याच्या वड्या पाडून घ्याव्यात. आणि थोडावेळ सेट होण्यासाठी झाकून ठेवाव्यात.

  6. 6

    आता एका कढईत तळणीसाठी तेल घेऊन तेल गरम झाल्यानंतर मध्यम आचेवर वड्या सोनेरी होईपर्यंत तळून घ्याव्यात आणि गरमागरम वड्या चिंच खजुराच्या चटणीसोबत सर्व्ह कराव्यात.
    टीप - पिठात एखादा चमचा तांदुळाचे पिठ घातले तर वड्या अजून थोड्या खुसखुशीत होतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pooja Kale Ranade
Pooja Kale Ranade @Pet_Po0ja
रोजी
cooking हा माझा एक आवडता छंद आहे, वेगवेगळ्या रेसिपी try करायला मला खूपच आवडते माझे स्वयंपाकघर ही माझी प्रयोगशाळा आहे म्हणायला हरकत नाही. फक्त मी हाडाची vegetarian असल्याने veg रेसिपीच try करते. वेगवेगळ्या रेसिपी साठी लागणारी वेगवेगळी भांडी आणि त्या सर्व्ह करण्यासाठी आकर्षक अशी भांडी खरेदी करायला ही मला खुप आवडते
पुढे वाचा

Similar Recipes