कोथिंबीर (वडया) (kothimbir wadi recipe in marathi)

Sheetal Talekar
Sheetal Talekar @cook_31166972

#EB1 महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली #W1 साधी सोप्पी रेसीपी आणि मस्त खमंग ,कुरकुरीत ( कोथिंबीरच्या वड्या ) ....... ( #विंटर स्पेशल रेसिपीज E book )

कोथिंबीर (वडया) (kothimbir wadi recipe in marathi)

#EB1 महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली #W1 साधी सोप्पी रेसीपी आणि मस्त खमंग ,कुरकुरीत ( कोथिंबीरच्या वड्या ) ....... ( #विंटर स्पेशल रेसिपीज E book )

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ तास
3ते 4 सर्व्हिंग
  1. 1जुडी कोथिंबीर
  2. 1 कपबेसन
  3. 1/4 कपतांदळाचे पीठ
  4. 1 मोठा चमचालहसुण आणि हिरव्या मिरच्यांची पेस्ट
  5. 1/2 चमचालाल तिखट
  6. 1/4 चमचाहळद
  7. 1/2 चमचापांढरे तिळ
  8. 1/2 चमचाजीरे
  9. चवी नुसारमीठ
  10. 4 चमचेपाणी
  11. 1/2 चमचातेल
  12. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    प्रथम १ कोथिंबीरची जुडी घेऊन ती निवडून आणि स्वच्छ धुऊन सुकवून घ्यावी.

  2. 2

    आता त्यात १ कप बेसन, १/४ कप तांदळाचे पीठ, १ मोठा चमचा लहसुण आणि हिरव्या मिरच्यांची पेस्ट, १/२ चमचा लाल तिखट, १/२ चमचे जीरे, १ चमचा तिळ, आणि शेवटी चवी नुसार मीठ घालावे.

  3. 3

    आता पाणी न घालता ते सर्व जिन्नस एकत्र करावे. आता त्यात थोडे थोडे पाणी घालून त्याचा घट्ट असा गोळा तयार करून घ्यावा.

  4. 4

    आता ताटाला १/२ चमचे तेल पसरून लावावे. नंतर तो गोळा घेऊन त्यावर थापुन पसरट करावा. नंतर ते १५ मिनिटे वाफवुन घ्यावे.

  5. 5

    आता ते पुर्ण पणे गार होऊन द्यावे. नंतर सुरीला थोडे तेल लावावे. आता ते गार झालेले जिन्नस सूरीने कापुन त्याच्या वड्या तयार करून घेणे.

  6. 6

    आता एका पॕनमध्ये तेल गरम करुन त्यात त्या वड्या तळुन घ्यावेत. तळून झालेल्या वड्या आता मस्त साँस बरोबर किंवा चटणी बरोबर सर्व्ह करु शकता.

  7. 7

    अश्या प्रकारे (कोथिंबीरच्या वड्या) तयार आहेत. मस्त खमंग आणि कुरकुरीत..... तुम्हाला रेसीपी आवडली तर नक्की करून बघा...... या थंडीच्या दिवसांत हेल्दी खा आणि मस्त रहा....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sheetal Talekar
Sheetal Talekar @cook_31166972
रोजी

Similar Recipes