तांबडा रस्सा (tambada rassa recipe in marathi)

Manisha Satish Dubal
Manisha Satish Dubal @manishadubal
Sanpada ( Navi Mumbai)

तांबडा रस्सा (tambada rassa recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनिटे
4 लोकांकरिता
  1. 1/2 किलोमटण
  2. 1 टीस्पून हळद
  3. 2 टीस्पून मीठ
  4. 1बारीक चिरलेला कांदा
  5. 4-5 टेबलस्पूनतेल (आवश्यकतेनुसार)
  6. 9-10कढीपत्ता पाने
  7. 1 टीस्पून आले - लसूण - कोथंबीर पेस्ट
  8. वाटण मसाला करण्यासाठी साहित्य -
  9. 1/2 वाटीसुखे खोबरे
  10. 1/2नारळ ओले खोबरे
  11. 1कांदा
  12. 2लसूण कांदे
  13. 1/2 इंचआल्याचा लहान तुकडा, मूठभर कोथंबीर
  14. 1 टेबलस्पूनप्रत्येकी धने, तीळ
  15. 1 टीस्पून प्रत्येकी बडीशेप, खसखस,
  16. 1/2 टीस्पूनकाळीमिरी, लवंग
  17. 1-1/2 इंचदालचिनीचा छ तुकडा
  18. 1हिरवी वेलची
  19. 3 चक्रीफूलाच्या पाकळ्या
  20. इत्तर मसाले
  21. 3 टेबलस्पूनकाळा मसाला
  22. 2 टीस्पूनलाल तिखट

कुकिंग सूचना

45 मिनिटे
  1. 1

    मटण व्यवस्थित स्वच्छ करून त्याला हळद, चवीनुसार मीठ (साधारणपणे 2-2½ टीस्पून) व आले - लसूण - कोथम्बीर पेस्ट घालून मॅरीनेट करावे. दहा मिनिटांनी कुकरमध्ये तेल गरम करून, कढीपत्ता, कांदा फोडणीला घालावा. कांदा ब्राऊन रंगाचा झाल्यावर मटण घालावे व परतावे

  2. 2

    मटण परतल्यावर झाकण झाकून एक वाफ येऊ द्यावी. त्यानंतर 2-3 ग्लास गरम पाणी घालून कुकरचे झाकण लावून 4-5 शिट्या होऊ द्याव्यात.

  3. 3

    कूकरच्या शिट्या होईपर्यंत ओले खोबरे व हिरवा मसाला सोडून बाकीचे वाटणाचे सर्व साहित्य भाजून घेऊन सर्व साहित्य एकत्रित वाटून घ्यावे.

  4. 4

    कुकर थंड झाल्यावर मटण शिजल्याची खात्री करून मटण डिशमध्ये वेगळे काढून (उरलेले अळणी) मटण स्टॉक चा रस्सा करण्यासाठी कढईत तेल गरम करून वाटलेले वाटण, लाल तिखट, काळामसाला घालून तेलावर परतावे.

  5. 5

    परतलेला मसाला, मटण स्टॉक मध्ये घालून, आवश्यकतेनुसार पाणी व मीठ घालून एक उखळी आणावी. पाच मिनिटे शिजू द्यावे. तयार "तांबडा मटण रस्सा" भाकरी, चपाती किंवा भाताबरोबर बरोबर सर्व्ह करावा. 🥰

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Manisha Satish Dubal
रोजी
Sanpada ( Navi Mumbai)

टिप्पण्या

Similar Recipes