आवळा गटागट कॅंडी (awla candy recipe in marathi)

लता धानापुने
लता धानापुने @lata22

#EB6
#Week6
#विंटर_स्पेशल_ebook_रेसिपीज

"आवळा गटागट कॅंडी"

खुप छान होते कॅंडी.. आवळा आणि गुळाचे मिश्रण चांगले शिजवून घेतले तर ही कॅंडी सहा महिने टिकते..
उन्हात वाळवून आवळा कँडी बनवतात,पण ती सोय नसेल तर या पद्धतीने अगदी झटपट आणि चवदार कॅंडी तयार होते..

आवळा गटागट कॅंडी (awla candy recipe in marathi)

#EB6
#Week6
#विंटर_स्पेशल_ebook_रेसिपीज

"आवळा गटागट कॅंडी"

खुप छान होते कॅंडी.. आवळा आणि गुळाचे मिश्रण चांगले शिजवून घेतले तर ही कॅंडी सहा महिने टिकते..
उन्हात वाळवून आवळा कँडी बनवतात,पण ती सोय नसेल तर या पद्धतीने अगदी झटपट आणि चवदार कॅंडी तयार होते..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

चाळीस मिनिटे
घरातील सगळ्यांस
  1. 1/4 किलोआवळे
  2. 1/4 किलोगूळ
  3. 1/2 टीस्पूनभाजलेली जीरे पूड
  4. 1/2 टीस्पूनकाळीमिरी पावडर
  5. 1/2 टीस्पूनकाळे मीठ
  6. 1/2 टीस्पूनसुंठ पावडर
  7. 2 टीस्पूनआमचूर पावडर
  8. 1 टीस्पूनओवा
  9. 1/2 टीस्पूनहिंग
  10. चवीनुसारमीठ
  11. 1/4 कपपीठी साखर

कुकिंग सूचना

चाळीस मिनिटे
  1. 1

    आवळे स्वच्छ धुवून घ्या. पातेल्यात दोन कप पाणी घालून मिडीयम गॅसवर उकळी आणावी व त्यात आवळे घालून पाच मिनिटे शिजू द्यावे. गॅस बंद करावा आणि झाकणं ठेवून दहा मिनिटे तसेच बाजूला ठेवा..

  2. 2

    आवळे थंड झाल्यावर बोटांनी दाबले की सहज आवळ्याच्या कळ्या बाजूला होतात.. आतील बिया काढून टाकाव्यात. पाणी न वापरता मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.

  3. 3

    गूळ सुरीने कापून घ्या व जाड बुडाच्या कढईत आवळा पेस्ट आणि गूळ घालून गॅसवर ठेवावे व सतत हलवत रहा..

  4. 4

    मिश्रण घट्ट होत आले की त्यात काळीमिरी पावडर,काळे मीठ,साध मीठ,सुंठ पावडर, आमचूर पावडर, हिंग या सर्व जिन्नस घालून मिक्स करा व मिश्रण एकजीव करून घट्ट गोळा होईपर्यंत हलवत रहा.

  5. 5

    मिश्रण घट्ट झाल्यावर गॅस बंद करा व मिश्रण पसरून घ्या आणि दोन तास असेच थंड करून घ्या

  6. 6

    गटागट कॅंडी बनवण्यासाठी मिश्रण तयार आहे.. प्लेटमध्ये काढून घ्या. दुसऱ्या प्लेटमध्ये पीठी साखर घ्या. हाताला पीठी साखर लावून छोटे छोटे गोळे करून पीठी साखरे मध्ये घोळवून प्लेटमध्ये ठेवा.

  7. 7

    अर्धा तास असेच ताटात सुकू द्यावे व नंतर प्रत्येक कॅंडी हातावर घेऊन गोल फिरवून घ्या. जास्तीची साखर निघते व कॅंडी छान बनते.. एक तास सुकवून डब्यात भरून ठेवा..

  8. 8
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
लता धानापुने
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes