मटार पोहे (matar pohe recipe in marathi)

Sheetal Talekar
Sheetal Talekar @cook_31166972

मस्त थंडीच्या दिवसात बाजारात खूपच ताजा मटार आला आहे . मटारचे अनेक रेसिपी बनवतात. त्यातलीच एक रेसिपी ( मटार पोहे ).

मटार पोहे (matar pohe recipe in marathi)

मस्त थंडीच्या दिवसात बाजारात खूपच ताजा मटार आला आहे . मटारचे अनेक रेसिपी बनवतात. त्यातलीच एक रेसिपी ( मटार पोहे ).

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/५ मिनिटांत
  1. 2 कपजाड पोहे
  2. 1/2ताजा मटार
  3. तेल
  4. हिंग + जिर + राई
  5. 4हिरव्या मिरच्या
  6. 6कडीपत्याची पाने
  7. कोथिंबीर
  8. चवी नुसारमीठ
  9. 1 चमचासाखर

कुकिंग सूचना

१/५ मिनिटांत
  1. 1

    प्रथम २ कप जाडा पोहे स्वच्छ धुवून घेणे. आणि बाजूला ठेवून देणे.ताजा मटार

  2. 2

    आता कढईत तेल गरम करून त्यात हिंग + जीर + राई घालून तडतडून देणे.

  3. 3

    आता १ बारीक कापलेला कांदा घालून तो थोडा सोनेरी होईपर्यत परतून घ्यावे. आता त्यात ताजा मटार आणि अगदी थोडे मीठ घालून परतून घेऊन...

  4. 4

    त्यावर झाकण ठेवून ५ ते १० मिनिटे वाफ काढून घेणे. मटार शिजला पाहिजे.मटार शिजुन मऊ झाला कि, त्यात १/२ चमचा हळद घालावी..

  5. 5

    आणि चवीनूसार मीठ घालून ते परत सर्व एकत्र छान हलवून घेणे. आता त्यात पोहे घालून परत एकदा छान हलवून घेणे..

  6. 6

    आता त्यावर १ चमचा साखर फेरावी. आणि थोडी कोथिंबीर घालून परत एकदा सर्व एकत्र हलवून घेऊन त्यावर झाकण ठेवून ५ मिनिटे वाफ काढून घ्यावी.

  7. 7

    अश्या प्रकारे गरमागरम (मटार पोहे) तयार आहेत. तर असेच सर्व थंडीत दिवसांत मस्त हेल्दि खा आणि छान रहा....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sheetal Talekar
Sheetal Talekar @cook_31166972
रोजी

Similar Recipes