पोहे (pohe recipe in marathi)

Seema Mate
Seema Mate @cook_22805348

#फोटोग्राफी
नुकताच जागतिक "पोहे दिन" सगळीकडे साजरा करण्यात आला आणि अनेकांनी पोह्या प्रति असलेल्या आपल्या भावना आपले प्रेम व्यक्त केले ...कुणी खाऊन तर कुणी दुसऱ्यांना खाऊ घालण्यात आनंद मानला आणि काम आणू नये??कारण अनेक मैत्रिणींच्या आनंदात सहभागी झालेले हे पोहे ,तर एखाद्याच्या घरी कुणी दगावलेल
असेल तर अशावेळी तिथे जाऊन पोहे खाऊ घालण्याची प्रथा अजूनही प्रचलित आहे..जणू आम्ही पण तुमच्या दुःखात सहभागी आहोत हेच त्यांना सुचवायचं असेल...स्वर्गात बांधलेल्या जोडीदाराच्या गाठी पृथ्वीतलावर मात्र हा पोह्यांच्या साक्षीने घट्ट रोवल्या जातात... तर्री पोह्याच्या ह्या पदार्थाला अनेकांनी व्यवसायिक रूप देऊन आपली विस्कटलेली आर्थिक बाजू रुळावर आणले हे आपण जाणतोच ....असो तर असे हे पोहे सर्वज्ञात असले तरी ते बनवण्याची पद्धत मात्र सगळीकडे वेगवेगळी आहे ..कधी त्यांना दडपे पोहे ,कधी कांदे पोहे ,बटाटे पोहे, कधी वाफेवरचे पोहे अशा वेगवेगळ्या स्वरूपात बनवतात....पण मला मात्र पोह्यामध्ये कांदा, बटाटे ,लिंबू सगळ्याच वस्तू एकत्र हव्या असतात आणि त्याच पद्धतीनेच मी नेहमी बनवते चला तर मग....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 250 ग्रॅमजाड पोहे
  2. 150 ग्रॅमशेंगदाणे
  3. 2मध्यम आकाराचे कांदे
  4. 1बटाटा
  5. 6-7 हिरव्या मिरच्या
  6. कोथिंबीर
  7. 1/2लिंबू
  8. 10/ 12 कडीपत्त्याची पाने
  9. 1 लहानचमचा मीठ
  10. 1/2 चमचाहळद
  11. 1/2 चमचासाखर
  12. 1 टीस्पूनजिरे
  13. 1 टीस्पूनमोहरी
  14. 4 चमचातेल

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम पोहे चाळून स्वच्छ धुऊन घ्या या आणि नंतर कढईत तेल घालून मोहरी,जिरे, शेंगदाणे,कढीपत्ता घालून अर्धा मिनिट शिजू..

  2. 2

    शेंगदाणे लाल झाले की त्यात उभा चिरलेला कांदा,बारीक केलेल्या बटाट्याच्या फोडी, चिरलेली हिरवी मिरची घालून छान मऊ होईपर्यंत शिजू द्या (शक्यतोवर मिरचीचे दोनच तुकडे करायचे काढायला सोपे जातात).

  3. 3

    नंतर त्यात अर्धा लिंबाचा रस, साखर,मीठ, हळद घालून परतवा...एक दणदणीत वाफ़
    आली की कोथिंबीर घालून गार्निश करा. (गार्निश करिता अर्धा वाटी पोहे तेलातून घ्यायचे आणि तयार पोह्यांवर घालायचे).

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Seema Mate
Seema Mate @cook_22805348
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes