राघवदास लाडू (Raghavdas laddu recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

#EBN14
#W14
#राघवदासलाडू

राघवदास लाडू ही कोकणातील पारंपरिक रेसिपी आहे ‌. गणेशोत्सव दरम्यान हा लाडू खास श्रीगणेशाला नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो.
रवा ,ओले खोबरे आणि साखरेच्या पाकापासून हे लाडू तयार केले जातात .
या लाडूंना 'नारायणदास ' लाडू असेही म्हणतात.
झटपट देखील बनवून होतात.
पाहूयात रेसिपी.

राघवदास लाडू (Raghavdas laddu recipe in marathi)

#EBN14
#W14
#राघवदासलाडू

राघवदास लाडू ही कोकणातील पारंपरिक रेसिपी आहे ‌. गणेशोत्सव दरम्यान हा लाडू खास श्रीगणेशाला नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो.
रवा ,ओले खोबरे आणि साखरेच्या पाकापासून हे लाडू तयार केले जातात .
या लाडूंना 'नारायणदास ' लाडू असेही म्हणतात.
झटपट देखील बनवून होतात.
पाहूयात रेसिपी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ तास
४ ते ५ जणांसाठी
  1. 1 कपबारीक रवा
  2. 1/2 कपओल्या नारळाचा किस
  3. 1 कपसाखर
  4. 1 कपपाणी
  5. वेलची,जायफळ पूड
  6. आवडीप्रमाणे मनूके
  7. गरजेनुसार तूप

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    पॅनमधे पळीभर तूप गरम करून रवा छान गुलाबी रंगावर भाजून घ्या.

  2. 2

    नंतर त्यात ओले खोबरे घालून रवा आणि खोबरे छान भाजून घ्या.

  3. 3

    एका पातेल्यात साखर आणि पाणी एकत्र करून त्याचा एकतारी पाक तयार करा‌. पाक तयार झालाय की नाही ओळखण्यासाठी,बोटामधे पाकाचे थोडे मिश्रण घेऊन एक तार येते की नाही हे पाहावे. एकतार आली की,समजावे पाक तयार आहे. पाकामधे वेलची आणि जायफळ पूड घालावी.

  4. 4

    आता तयार पाक भाजलेल्या रव्याच्या मिश्रणात ओता‌. व छान मिक्स करून घ्या‌. आता २० मि ‌‌‌हे मिश्रण झाकून ठेवा.

  5. 5

    २० मि. नंतर मिश्रण छान हाताने एकजीव करा ‌.मनुके घालून लाडू वळून घ्या. राघवदास लाडू तयार‌.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

Similar Recipes