राघवदास लाडू (Raghavdas laddu recipe in marathi)

Shital Muranjan
Shital Muranjan @shitals_delicacies

#EB14 #W14
राघवदास लाडू म्हणजेच रवा नारळ लाडू. अतिशय चविष्ट लागतात हे लाडू. नक्की करून पहा. याचे परफेक्ट प्रमाण देत आहे ते पुढीलप्रमाणे...

राघवदास लाडू (Raghavdas laddu recipe in marathi)

#EB14 #W14
राघवदास लाडू म्हणजेच रवा नारळ लाडू. अतिशय चविष्ट लागतात हे लाडू. नक्की करून पहा. याचे परफेक्ट प्रमाण देत आहे ते पुढीलप्रमाणे...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
25 लाडू
  1. 1 कपखवलेला ताजा नारळ
  2. 2 कपरवा
  3. दिड कप साखर
  4. 1 कपपाणी
  5. 4 टेस्पूनतूप
  6. 1/2 टिस्पून वेलची पूड
  7. बेदाणे आवडीनुसार

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    प्रथम नारळ खोवून घ्या. नारळाचा फक्त पांढरा भाग घ्यावा. करवंटीकडील काळपट भाग घेऊ नये.
    रवा मंद आचेवर 3-4 मिनीटे कोरडाच भाजावा. तळापासून सारखे ढवळत राहावे जेणेकरून रवा जळणार नाही. रंग बदलेस्तोवर भाजू नये, अगदी हलकेच भाजावे. नंतर परत रवा भाजायचा आहे.

  2. 2

    भाजलेला रवा परातीत काढावा. त्यात खवलेला नारळ घालावा आणि मिसळावे. नारळातील ओलसरपणा रव्यात उतरेस्तोवर 10 मिनीटे तसेच ठेवावे.

  3. 3

    कढईत तूप गरम करून त्यात रवा-नारळाचे मिश्रण घालावे. मिश्रण मिडीयम-स्लो फ्लेमवर भाजावे. सतत तळापासून ढवळावे. काही वेळाने भाजलेल्या रव्याचा छान वास येईल. रव्याचा रंग हलका बदामी होईस्तोवर भाजावे. भाजलेले मिश्रण परातीत काढून ठेवावे.

  4. 4

    साखर आणि पाणी एकत्र करून एकतारी पाक करावा. मिश्रण उकळायला लागले कि साधारण 3 ते 4 मिनीटांनी पाक एकतारी झाला आहे का हे बघावे. जर एक तार दिसली कि पाक तयार आहे असे समजावे किंवा एकतारी पाक ओळखता येत नसेल. मिश्रण उकळायला लागले कि 3 ते 4 मिनीटात एकतारी पाक तयार होतो. पाक तयार झाला कि गॅस बंद करावा.

  5. 5

    लगेच पाक रवा-नारळाच्या मिश्रणात ओतावा. सर्व मिश्रण एकजीव करावे. मिश्रण सुरूवातीला पातळ दिसेल पण काहीवेळाने घट्ट होत जाईल. आता यामध्ये वेलचीपूड घालावी. मिश्रण आळेस्तोवर अधूनमधून मिक्स करत राहावे. मिश्रण आळले कि लाडू वळावेत. प्रत्येक लाडवावर एकेक बेदाणा लावावा. यात आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट घालू शकता.

  6. 6

    टीप: ओलं खोबरं वापरलं असल्यामुळे हे लाडू फार काळ टिकत नाहीत, जास्तीत जास्त 8-9 दिवस टिकतील. उष्ण आणि दमट हवामानात 4-5 दिवसच टिकतील. अशावेळी 2 दिवसांनी लाडू फ्रिजमध्ये ठेवावेत.

  7. 7

    टीप: लाडूचे मिश्रण जर फारच कोरडे झाले तर एकतारी पेक्षा पाक जरा जास्त पुढे गेला तर असे होते. अशावेळी 1/2 कप पाणी + 3 टेस्पून साखर असे मिश्रण उकळवावे. 4 मिनीटे उकळवून पाक लाडू मिश्रणावर ओतावा. मिक्स करून मिश्रण आळले कि लाडू वळावेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shital Muranjan
Shital Muranjan @shitals_delicacies
रोजी
Follow to learn Awesome Delicacies to bring sweetness to your life n your loved ones|Homebaker|Author|foodblogger|Creative||vegetarian| |Food Photography | |Love for Cooking baking|
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes