फराळी पॅटिस (Farali patties recipe in marathi)

Pradnya Purandare
Pradnya Purandare @pradnya_dp
Mumbai

#EB15 #W15
उपवास म्हटला म्हणजे विविध प्रकारचे फराळाचे पदार्थ आपल्या मनात येतात. यातलाच एक प्रकार म्हणजे फराळी पॅटिस. माझे बालपण गिरगाव मध्ये गेले तिथे असलेली खास उपहारगृह प्रकाश, पणशीकर यांच्याकडे उपवास स्पेशल खूप पदार्थ असतात त्यातलाच हा एक पदार्थ.. मजा म्हणजे गिरगाव मध्ये फरसाणवाल्या गुजराती दुकानातही फराळी पॅटिस मिळतो. त्यातील नारळाच्या गोडसर- तिखट सारणामुळे मला फार आवडायचा. आज मी सुद्धा फराळी पॅटिस बनवला आहे फक्त यामध्ये मी बटाट्या बरोबर राजगिर्‍ याचे पिठ, रताळे थोडया प्रमाणात वापरले आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटं
2-3 सर्व्हिंग्ज
  1. पारीसाठी
  2. 2 ते तीन उकडलेले मोठे बटाटे
  3. 1 लहानरताळे उकडून
  4. 1/4 कपराजगिरा पीठ
  5. मीठ चवीनुसार
  6. आतील सारणासाठी
  7. 1/4 कप ओला किसलेला नारळ
  8. 1/4 कपदाण्याचा जाडसर दळून कूट
  9. अर्धे छोटे उकडलेले रताळे
  10. 1 1/5 टी स्पून आले, मिरची, जीरे वाटण
  11. 1 टेबल स्पूनलिंबाचा रस
  12. मनुके, काजू तुकडे (ऑप्शनल)
  13. मीठ चवीनुसार
  14. 1 टीस्पूनपिठीसाखर

कुकिंग सूचना

15 मिनिटं
  1. 1

    उकडलेले बटाटे आणि रताळे बारीक किसणीवर किसून घ्यावेत. त्यामध्ये राजगिऱ्याचे पीठ, एक टी स्पून लिंबाचा रस, मीठ घालून ते मिश्रण व्यवस्थित मळून घ्यावे. आपले पारी चे मिश्रण तयार.

  2. 2

    एका भांड्यामध्ये आतील सारणासाठी ओला नारळ, दाण्याचे कूट, आले मिरची वाटण,उकडलेले रताळे कुस्करून, लिंबाचा रस, चवीनुसार मीठ थोडी पिठीसाखर असे सर्व घालून व्यवस्थित एकजीव करून घ्यावे.

  3. 3

    आपल्याला हव्या त्या आकाराची बटाट्याची पारी बनवून त्यामध्ये वर तयार केलेल्या सारणाची गोळी भरून हव्या त्या आकारात मध्ये पॅटीस बनवून घ्या. कढईमध्ये मध्यम आचेवर तेल गरम करा. एका ताटात थोडे राजगिरा पीठ घेऊन त्यात तयार पॅटीस हलकेच घोळवून मग तेलात मध्यम आचेवर गुलाबी रंगावर तळून घ्या.

  4. 4

    चटणीसाठी मिक्सरच्या भांड्यात दाण्याचे कूट,दोन-तीन टेबलस्पून दही एखाद-दुसरी मिरची, थोडी जीरे पावडर मीठ,साखर घालून बारीक फिरवून घ्या आणि या पॅटीस बरोबर सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pradnya Purandare
Pradnya Purandare @pradnya_dp
रोजी
Mumbai
Easy serv in busy life.. Haveeka
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes