उपवासाचे पॅटीस (Upwasache patties recipe in marathi)

Kalpana D.Chavan
Kalpana D.Chavan @cook_22945952

उपवासाचे पॅटीस (Upwasache patties recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मिनिट
3-4 सर्व्हिंग्ज
  1. 3बटाटे (उकडलेले)
  2. 1 टेबलस्पूनआरारुट
  3. सारण करण्यासाठी :-
  4. 1 वाटीओले खोबरे
  5. 1 टीस्पूनआल मिरची जीरे जाडसर पेस्ट
  6. 2 टेबलस्पूनदाण्याचा कूट
  7. 4 टीस्पूनसाखर
  8. 1/2 टीस्पूनलिंबाचा रस
  9. 1 टीस्पूनकाजू (बारीक तुकडे)
  10. 1 टीस्पूनबेदाणे
  11. 1 टेबलस्पूनतूप
  12. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

40 मिनिट
  1. 1

    उकडलेले बटाटे कुस्करून त्यात एक टेबलस्पून अरारुट व चिमुटभर मीठ घालून मऊसर गोळा मळून घ्यावा.

  2. 2

    सारण करण्यासाठी कढई मध्ये एक टेबलस्पून तूप गरम करून त्यात आल,मिरची,जीरे यांची पेस्ट परतून घ्यावी. गॅस मंद असावा.

  3. 3

    नंतर त्यात ओले खोबरे व साखर मंद आचेवर परतावे. साखर विरघळली की गॅस बंद करून त्यात दाण्याचा कुट,लिंबाचा रस, काजू,बेदाणे व चिमुटभर मीठ घालून मिश्रण व्यवस्थित मिक्स करावे.

  4. 4

    उकडलेल्या बटाट्याचा लिंबाएवढा गोळा घेऊन त्याची पारी करावी व त्यात एक टेबलस्पून सारण भरून पारी बंद करावी.

  5. 5

    कढई मध्ये तेल गरम करून मध्यम आचेवर सर्व पॅटीस तळून घ्यावे.दही व खोबऱ्याचा चटणी सोबत सर्व्ह करावे.
    टीप:पॅटीस तळताना फुटत असतील तर आरारुट मध्ये घोळाऊन घ्यावे व नंतर तेलात घालावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Kalpana D.Chavan
Kalpana D.Chavan @cook_22945952
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes