मिसळ पाव (Misal pav recipe in marathi)

Rupali Deshpande
Rupali Deshpande @Rupali1781

मिसळ पाव (Misal pav recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45-50 मिनिट
5 सर्व्हिंग्ज
  1. 2 कपमोड आलेली मटकी
  2. 2-3कांदे
  3. 2छोटे टोमॅटो
  4. 8-9लसुण पाकळ्या
  5. 1 इंचआले
  6. 2 टेबलस्पूनलालतिखट (कमी -जास्त करावे)
  7. 2 टेबलस्पूनकांदा लसुण मसाला(कमी -जास्त करावे)
  8. 1 टेबलस्पूनकाश्मिरी लालतिखट
  9. 3 टेबलस्पूनतेल
  10. 2 टीस्पूनपांढरे तीळ
  11. 2 टीस्पूनखसखस
  12. 1/4 कपखिसलेले खोबरे
  13. चवीनुसारमीठ
  14. आवश्यकतेनुसार गरम पाणी
  15. कोथिंबीर
  16. 1/4 कपबारीक चिरलेला कांदा (वरून घालण्यासाठी)
  17. 1लिंबू
  18. आवश्यकतेनुसार लादी पाव / स्लाईझ ब्रेड

कुकिंग सूचना

45-50 मिनिट
  1. 1

    प्रथम मोड आलेली मटकी स्वच्छ धून घेणे. नंतर ती मटकी छोटया कुकर मध्ये घेऊन त्यात 1 छोटा चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी घालावे. व झाकण लावून त्याची 1 शिट्टी करून ती मटकी शिजवून घेणे.किंवा पातेले मध्ये गरम पाणी घालून 5-7मिनिटे शिजवून घेणे. मटकी शिजवताना त्यात हळद, मीठ घालून शिजवणे.

  2. 2

    आतामिसळ मसाला करण्यासाठी एका प्लेट मध्ये 3 कांदे, टोमॅटो उभे चिरुन घेणे. खोबरे खिसुन घेणे.लसुण, आले घेणे.आता गॅस वर कढई ठेवून त्यात सोनेरी रंगावर खोबरे, खसखस आणि तीळ भाजून घेणे. व त्याच कढई मध्ये थोडे तेल घालून कांदा, लसुण, आले आणि टोमॅटो छान एकजीव होईपर्यंत भाजून घेणे.

  3. 3

    आता हा भाजून घेतलेला मसालाथोडा थंड झाला कि मिक्सर भांडे मध्ये घेऊन त्याची पेस्ट करून घेणे. अशाप्रकारे मिसळ मसाला तयार.आता शिजवून घेतलेली मटकीतील पाणी काढून ठेवणे हे पाणी कट करताना त्या मध्ये घालणे.

  4. 4

    आता मिसळचा कट किंवा रस्सा करण्यासाठी.... गॅस वर एक पातेले ठेवावे त्यात 3 मोठे चमचे तेल घालावे. तेल तापले कि त्यात वाटून घेतलेला मसाला घालून घेणे. तो मसाला 3-4 मिनिटे परतून घेणे. आता त्या मध्ये चवीनुसार सगळे मसाले म्हणजे लाल तिखट, कांदा लसूण मसाला, काश्मिरी तिखट आणि चवीनुसार मीठ घालावे. व छान त्या मध्ये तेल सुटेपर्यंत परतून घेणे.

  5. 5

    आता या मसाल्या मध्ये निथळून घेतलेले मटकीचे पाणी घालावे. व आवश्यकतेनुसार पुन्हा गरम पाणी घालून 5-7 मिनिटे हा कट छान उकळून घेणे.

  6. 6

    आता मिसळ साठी मटकीची भाजी आणि कट दोनीही तयार आहे. आता मिसळ सर्व्ह करण्यासाठी कांदा, कोथिंबीर, लिंबू चिरून घेणे.

  7. 7

    मिसळ सर्व्ह करताना आधी प्लेट मध्ये भरपूर मिक्स फरसाण त्या वर मटकीची भाजी आणि त्या वर भरपूर कांदा आणि कोथिंबीर घालून वरून कट किंवा रस्सा घालून लादी पाव सोबत गरम गरम सर्व्ह करावी. मस्त झणझणीत मिसळ पाव तयार झाली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rupali Deshpande
Rupali Deshpande @Rupali1781
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes