झणझणीत मीसळ पाव (misal pav recipe in marathi)

Shobha Deshmukh
Shobha Deshmukh @GZ4447

#ks8 मीसळ पाव हा प्रकार पुणे - नगर रस्त्यावर फार मिळतो, व मीसळ पाव चे खुप स्टॅालस् आहेत प्रत्येक २ km वर १ स्टॅाल आहे. व चव ही खुप छान असते लाल तर्री वर तरंगत असते.अशी ही शीरुर ची मीसळ पाव.

झणझणीत मीसळ पाव (misal pav recipe in marathi)

#ks8 मीसळ पाव हा प्रकार पुणे - नगर रस्त्यावर फार मिळतो, व मीसळ पाव चे खुप स्टॅालस् आहेत प्रत्येक २ km वर १ स्टॅाल आहे. व चव ही खुप छान असते लाल तर्री वर तरंगत असते.अशी ही शीरुर ची मीसळ पाव.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मीनीट
२ लोक
  1. 1 कपमोड आलेली मटकी
  2. 1 कपचीरलेला कांदा
  3. 1/2टोमॅटो
  4. कोथिंबीर
  5. ८ पाकळ्यालसुन
  6. 1 टेबलस्पूनधने पुड
  7. 1 टेबलस्पून जीरेपुड
  8. 1/4 टेबलस्पून दालचिनी पावडर
  9. 1 टेबलस्पून लाल तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात
  10. 1/4 टेबलस्पूनहळद
  11. चवीपुरते मीठ
  12. 2 टेबलस्पूनतेल
  13. १/२ टेबलस्पून मोहरी
  14. 1/2लिंबु
  15. 2उकडलेले बटाटे
  16. 2 टेबलस्पूनखोबर
  17. 4पाव

कुकिंग सूचना

१० मीनीट
  1. 1

    बटाटे सोलुन भाजी करुन घेतली

  2. 2

    पॅन मधे तेल घेउन फोडणी करून त्या मधे लसुन पेस्ट व कांदा घालुन परतुन घेतले.त्या मधे खोबर पावडर व तिखट घालुन परतुन घेतले व नंतर टोमॅटो घातला. व तेल सुटे पर्यंत परतुन घेतले. नंतर त्या मधे मटकी घातली व बाकूचे मसाले व मीठ घातले व पाणि घालुन शीजवुन घेतले.

  3. 3

    ४ मीनीटे शीजवुन घेतल्या नंतर तयार आहे मीसळ. एका प्लेट मधे बटाट्याची भाजी, वर मटकीची मीसळ, वर पापडी, फरसाण घातले व कांदा कोथिंबीर घालुन सोबत पाव व लिंबु देउन सर्व्ह करा झणझणीत मीसळ पाव.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shobha Deshmukh
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes