कैरीचा छुंदा (Kairicha Chunda Recipe In Marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

नॅचरली उन्हामध्ये केलेला बिना तेलाचा छुंदा पराठा, ठेपला, चपातीबरोबर अतिशय छान लागतो

कैरीचा छुंदा (Kairicha Chunda Recipe In Marathi)

नॅचरली उन्हामध्ये केलेला बिना तेलाचा छुंदा पराठा, ठेपला, चपातीबरोबर अतिशय छान लागतो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10दिवस
वर्षभरासाठी
  1. 2 किलोतोतापुरी कैरीचा साल काढून केलेला कीस
  2. अडीच किलो साखर
  3. 10लवंगा
  4. तुकडेफोन मोठे दालचिनीचे
  5. 2 चमचेमीठ
  6. 5 मोठे चमचे काश्मिरी लाल तिखट
  7. 2 टीस्पूनहळद

कुकिंग सूचना

10दिवस
  1. 1

    कैऱ्या धुवून पुसून त्याची साल काढावी व किस करावा,किसलेल्या कैरी मध्ये साखर,मीठ व हळद घालून उन्हामध्ये सात दिवस ठेवावे त्याला पसरट काचेच्या भांड्याला कपडा बांधून ठेवावा

  2. 2

    रोज ऊन गेल्यावर घरात आणून कपडा काढून छान एकजीव करावं व परत कपडा बांधून ठेवावा सातव्या दिवसा नंतर त्यामध्ये लवंग दालचिनी व तिखट मिक्स करावं व एकजीव करावं व परत कपडा बांधून उन्हामध्ये अजून तीन दिवस ठेवावे

  3. 3

    10 ते 12 दिवसात आपला चुंदा घट्ट होतो व खाण्यासाठी तयार होतो नंतर तो एका स्वच्छ धुऊन पुसलेल्या काचेच्या बरणीत ठेवून थंड जागी स्टोअर करावा बाहेर वर्षभर छान राहतो व उन्हात वाढवल्यामुळे त्याच्यामध्ये विटामिन डी जीवनसत्व ही मिळते व चवीला अतिशय छान लागतो पराठा ठेपला चपाती बरोबर खाऊ शकता

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes