शेवग्याच्या शेंगा बटाटा भाजी (Shevgyachya Shenga Batata Bhaji Recipe In Marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

शेवग्याच्या शेंगा बटाटा भाजी (Shevgyachya Shenga Batata Bhaji Recipe In Marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३०
  1. 2शेवग्याच्या शेंगा
  2. 1बटाटा
  3. 1कांदा
  4. 1टमाटा
  5. 3 टेबलस्पूननारळाचा चव
  6. 2 टिस्पून आलं लसूण पेस्ट
  7. १ १/२ टेबलस्पून तेल
  8. १ १/२ टिस्पून तिखट
  9. 1 टिस्पून गरम मसाला
  10. 1 टिस्पून धणेपावडर
  11. 1/2 टिस्पून गुळ
  12. 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  13. 1/2 टिस्पून मोहरी
  14. 1/2 टिस्पून जीरे
  15. 1/2 टिस्पून हळद
  16. 1/4 टिस्पून हिंग
  17. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

३०
  1. 1

    प्रथम शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुऊन साल काढून त्यांचे पीसेस करून घेतले. कांदा टोमॅटो कोथिंबीर बटाटा सर्व चिरून घेतले. आलं लसूण ची पेस्ट करून घेतली.

  2. 2

    आता गॅसवर कढई मध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, हळद, जीरे, यांची फोडणी केली. त्यात कांदा घालून परतून घेतले. मग आले-लसूण पेस्ट घातली. व दोन्ही चांगल्या परतून घेतले. त्यानंतर त्यात टमाटा घालून तो चांगला मऊ शिजेपर्यंत झाकण ठेवून वाफ आणली.

  3. 3

    आता त्यात तिखट, धने पावडर गरम मसाला, नारळाचा चव घालून परतून घेतले मग त्यात बटाटा व शेवग्याच्या शेंगा घालून परतले.

  4. 4

    सर्व परतून झाल्यावर त्यात गरम पाणी, गुळ व मीठ घालून हलवून घेतले. व झाकण ठेवून आठ ते दहा मिनिट भाजी शिजवून घेतली. त्यातील बटाटे व शेंगा पूर्ण शिजवून घेतले.

  5. 5

    तयार शेवग्याच्या शेंगा व बटाट्याची भाजी वाटी मध्ये काढून सर्व्ह केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या

Similar Recipes